Tomato Price : सध्या राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. भाजीपाला पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसानं टोमॅटो (Tomato) पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 35 ते 40 रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाला आहे.
पावसामुळं टोमॅटोचं 50 टक्के उत्पादन घटलं
एपीएमसी घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. परतीचा पाऊस सुरु असल्यामुळं टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं टोमॅटोचं 50 टक्के उत्पादन घटलं आहे. त्यामुळं एपीएमसी बाजारात टोमॅटोचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले आहेत. मागील आठवड्यात 30 ते 32 रुपये प्रति किलो दरानं उपलब्ध असलेले टोमॅटो आता 35 ते 45 रुपयांवर विकले जात आहेत. सततच्या पावसामुळं आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत.
किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत
दरम्यान, मागील तीन ते चार दिवसांआधी 30 ते 40 रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात 60 ते 70 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ सोसावी लागत आहे. पावसामुळं टोमॅटोची आवक घटल्यानं भाववाढ झालीय. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढीलतीन ते चार दिवस पावसाचा ओघ पाहता हा दर चढाच राहिल अशी शक्यता आहे. राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका सर्वचं शेतमालाला बसत आहे. या पावसामुळं शेतमालाचं उत्पादन देखील घटत आहे. मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांसह टोमॅटो पिकाला देखईल बसला आहे. त्यामुळं बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून दरांमध्ये वाढ होत आहे. नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची एपीएमसी मार्केटमध्ये आवक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: