Sugarcane fire due to short circuit : सातारा जिल्ह्यातील वळसे गावातील 50 एकर उसाला आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पाण्यासाठी अंथरलेल्या पाईप, चेंबर तसेच विद्युत मोटारीचे मोठं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतातून विद्यूत तारा जात होत्या. त्यामध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.


दरम्यान, या घटनेनंतर शेतकऱ्यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमचा दोन एकर ऊस शॉर्ट सर्किट झाल्यामुले जळून खाक झाला आहे. सुरुचा एक एकर आणि खोडवा एकर ऊस होता. या आगीत आमच्या उसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती रंजना कदम यांनी दिली. ऊस आघीत जळून खाक झाल्याने वजनात घट येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.




दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत उसाबरोबरच आमच्या शेतातील पाईप आणि मोटारीचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी सचिन कदम यांनी दिली. पण आल लागल्यानंतर लगेच अजिंक्यतारा साखर कारखान्याने लगेच दखल घेत 24 तासांच्या आत आग लागलेला ऊस तोडायला सुरुवात केला असल्याचे सचिन कदम यांनी सांगितले. 


विद्युत प्रवाहाच्या तारा आमच्या उसातून गेल्या आहेत. याबाबत वारंवार महावितरकणकडे तक्रारी देऊसुद्धा त्यांनी काही दखल घेतली नसल्याची माहिती शेतकरी अमोल कदम यांनी दिली. महावितरणने दखल न घेतल्यामुळे आमच्या उसाचे नुकसान झाले आहे. या उसाच्या आगीत माझी केबल देखील जळून खाक झाली आहे. तसेच पाईप, चेंबर जळून खाक झाली असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. आम्हाला यासाठी काहीतरी मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: