Tractor sales : भारतात जुलै महिन्यात किती ट्रॅक्टरची विक्री (Tractor sales)झाली याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जुलै 2022 मध्ये 59 हजार 586 ट्रॅक्टरची विक्री झाल्याची नोंद केली आहे.  यामध्ये सर्वात जास्त ट्रॅक्टरची विक्री ही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), राजस्थान (Rajasthan), महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये झाली आहे. ट्रॅक्टर विक्रीच्या बाबातीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षीच्या म्हणजे जुलै 2021 महिन्याच्या तुलनेत यंदा ट्रॅक्टर विक्रीचे प्रमाण कमी आहे. ही विक्री 28 टक्क्यांनी कमी आहे. 


मह्राष्ट्रात जुलै 2022 मध्ये 7 हजार 108 ट्रॅक्टरची विक्री 


उत्तर प्रदेशमध्ये जुलैमध्ये सर्वाधिक ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. तिथे 11 हजार 284 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. तर जुलै 2021 मध्ये तिथे 12 हजार 310 ट्रॅक्टरची विक्री झाली होती. तर दुसरा क्रमांक हा राजस्थानचा लागतो. जुलै 2022 मध्ये राजस्थानमध्ये 9 हजार 152 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. ही विक्री जुलै 2021 मध्ये 11 हजार 368 झाली होती. महाराष्ट्राचा ट्रॅक्टर विक्रीत तिसरा क्रमांक लागतो. जुलैमध्ये 2022 मध्ये  महाराष्ट्रात 7 हजार 108 ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. 2021 जुलैमध्ये ही विक्री 10 हजार 662 होती.


महिंद्रा अँड महिंद्रा या ट्रॅक्टरची सर्वाधिक विक्री


जुलै 2022 मध्ये ट्रॅक्टरच्या विक्रीत घट होण्याची विविध कारणे आहेत. अनेक संकट आल्यामुळं ट्रॅक्टरच्या विक्रीत घट झाली आहे. मान्सून हंगामाचा असमान पडणारा पाऊस, तर जुलै महिन्यात काही ठिकाणी पूर यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. जुलै महिन्यात देशाच्या विविध भागांमध्ये पावासानं थैमान घातलं होतं. याचा मोठा परिणाम यावर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, या ट्रॅक्टक विक्रीच्या डेटामध्ये मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान, ट्रॅक्टर जंक्शनचे संस्थापक  रजत गुप्ता म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात ट्रॅक्टरची विक्री कमी झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरी पावसाचा अंदाज (LPA च्या 96-104%) देण्यात आला आहे. तसेच शेतातील पीकेही चांगला आहेत. त्यामुळं याचा चांगला परिणाम ट्रॅक्टर उत्पादनावर होई शकतो असेही ते म्हणाले. ब्रँडनुसार विचार केला तर  विक्रीमध्ये, महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) या कंपनीच्या ट्रॅक्टरची जुलैमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यानंतर स्वराज ट्रॅक्टर, त्यानंतर मॅसी फर्ग्युसन सोनालिका ट्रॅक्टर आणि एस्कॉर्ट्सस जॉन डियर यांचा क्रमांक लागतो.


ट्रॅक्टर जंक्शन बद्दल माहिती


ट्रॅक्टर जंक्शन हे शेतकऱ्यांसाठी भारतातील आघाडीचे डिजिटल मार्केटप्लेस आहे. नवीन/वापरलेले ट्रॅक्टर आणि शेती उपकरणे खरेदी, विक्री, वित्तपुरवठा, विमा आणि सेवा देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करते, हे या प्लॅटफॉर्मचे उद्दिष्ट आहे. कंपनीने ट्रॅक्टर, शेती उपकरणे आणि संबंधित आर्थिक उत्पादनांची किंमत, माहिती आणि तुलना यामध्ये पारदर्शकता आणून भारतीय ट्रॅक्टर उद्योगात क्रांती घडवून आणली आहे. ट्रॅक्टर जंक्शनमध्ये 300 हून अधिक नवीन ट्रॅक्टर, 75+ कापणी यंत्र, 580+ अवजारे, 135+ शेतीची साधने आणि 120+ टायर्सची सूची आहे. कंपनी राजस्थानमधील 3 ठिकाणी तिच्या फिजिकल आउटलेट्सद्वारे वापरलेल्या ट्रॅक्टरची खरेदी आणि विक्री करत आहे. या कंपनीची स्थापना 2019 मध्ये भारतीय शेतकऱ्यांना पारदर्शक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या कल्पनेतून करण्यात आली आहे. ही कंपनी रजत गुप्ता, शिवानी गुप्ता यांनी स्थापन केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: