Raju Shetti : येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गळीप हंगाम (Sugarcane crushing season) सुरु होणार आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला मात्र मागील वर्षीच्या थकीत FRP चं काय? असा खडा सवाल शेट्टींनी राज्य सरकारला केला आहे. थकीत 900 कोटींसह,  200 रुपये अधिकचे मिळेपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा शेट्टींनी दिला आहे.


आधी थकीत रक्कम द्या अन्यथा....


मागील वर्षी कारखान्यांना इथेनॉल विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा झाला होता.  त्यामुळं 200 रुपये अधिक देण्याची कारखान्यांची क्षमता असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आधी थकीत रक्कम द्या आणि मग कारखाने सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला सामोरे जा असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा साखर कारखानदार विरुद्ध राजू शेट्टी असा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून राज्य सरकारने ऊसाचा गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्या साखर कारखान्यांकडे 900 कोटी रुपयांची FRP (Fair & Remunerative Price) थकीत आहे. त्या थकीत FRP चं काय? असा सवाल  राजू शेट्टींनी केला आहे.  


पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांमधील संघर्ष थांबणार नाही


FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाना सुरु होऊ देणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले. गेल्या वर्षी निर्यात झालेल्या साखरेला चांगला दर मिळाला. देशांतर्गत साखरेला चांगला दर मिळाला. तसेच इथेनॉलच्या उत्पादनामुळं रोख पैसे उपलब्ध झाल्यामुळं साखर कारखान्यांकडे FRP शिवाय 200 रुपये ज्यादा देण्याची क्षमता तयार झाली आहे. हे पैसे जोपर्यंत मिळणार नाहीत तोपर्यंत ऊस उत्पादक आणि साखर कारखानदार हा संघर्ष थांबणार नाही. 15 ऑक्टोबरपासून तुम्हाला साखर कारखाने सुरु करायचे असतील तर खुशार सुरु करा. मात्र, शेतकऱ्यांची FRP आणि 200 रुपये ही देणी भागवा आणि मग कारखाने सुरु करा असे शेट्टी म्हणाले. कारखान्यांना ऊस देण्यासाठीच ऊस लावला आहे. निव्वळ ऊसच मागत राहिलात तर ऊसाचा बुडका कारखानदारांच्या पाठित बसल्याशिवाय राहणार नसल्याचे शेट्टी यावेली म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: