Puntamba Protest : पुणतांबा गावातील शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. किसान क्रांतीकडून आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणतांबा गावात झालेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तीन महिन्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा आंदोलकांना केला आहे. पुणतांबा गावात आज ग्रामसभा झाली. या ग्रामसभेत आंदोलन सुरु ठेवायचं की स्थगित करायचं? याबाबतचा निर्णय होणार होता. अखेर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेचा अहवाल देखील ग्रामसभेत आज मांडला होता. यावर चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्या या ग्रामसभेला पुणतांब्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी सहभागी झाले होते.
70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा
सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला आहे. केवळ सरकारला विरोध करायचा म्हणून हे आंदोलन नव्हतं असेही आंदोलकांना सांगितले आहे. शेतकरी प्रश्नावर सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुणतांबा व्यासपीठ कायम लढा सुरु ठेवणार असल्याचे आंदोलकांना सांगितले.
1 जून ते 4 जून झालं होतं आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात पुणतांब्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकरी प्रश्नांवरुन ग्रामस्थांनी 1 जूनपासून धरणे आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनाची खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दखल घेतली होती. भुसे यांनी पुणतांब्यात येऊन आंदोलकांशी चर्चा केली होती. त्यानंतर आंदोलकांनी 4 जूनला आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाची मंगळवारी (8 जून) मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी अनेक मंत्री देखील उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल आजच्या ग्रामसभेत मांडण्यात आला होता.
सरकारने घेतलेले निर्णय
थकित वीज बिलाचे व्याज दंड माफ होणार कृषीपंपाचा पन्नास टक्के वीज बिल माफ करणार राज्य सरकारकडून लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन कृषीसाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करणार पूर्ण विजबिल भरणारास सोलर पंप दिले जाणार सोलर पंपासाठी 60 टक्के अनुदान दिले जाणार 15 जुनपर्यंत उसाचे गाळप करणारगाळपाविना ऊस शिल्लक राहीला तर अनुदान दिले जाणार15 जूननंतर आढावा घेऊन सरकार उसाला अनुदान देणार गाळपासाठी गेलेल्या ऊसाला प्रतिटन एक हजार देण्यास सरकारचा नकार कांद्याला अनुदान देण्यास सरकारचा नकार कांद्याच्या हमीभावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारआयात निर्यात धोरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारदुधाच्या एआरपीसाठी कमिटी गठीत होणारभारतभर दुधाचा एकच दर राहावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणारदुध दराच्या तफावतीमुळे दुधाला हमीभाव देणं अशक्यफळे आणी भाजीपाल्याचे दर निश्चित करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावानियमित कर्ज भरणारांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणारएक जुलैपासून अनुदान थेट कर्जदाराच्या खात्यावर जमा होणारराज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी मिळणारदोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणारांनाही मिळणार लवकरच कर्जमाफीदोन लाखाच्या पुढची बाकी शेतकऱ्यांना भरावी लागणार...राज्य सरकार घेणार लवकरच निर्णयकांदा, गव्हासह इतर आयात निर्यात धोरणासाठी राज्यसरकारचं शिष्टमंडळ केंद्र सरकारची भेट घेणारमागेल त्या शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणारसॅटेलाईटव्दारे पिक पाहणीसाठी यंत्रणा उभारणारखतांच्या अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावापाच एकर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना विहीर देणारशेतकरी कुटुंबासाठी दोन लाख रुपयांचा विमा2017 साली झालेल्या शेतकरी संप आंदोलनातील गुन्हे मागे घेतले जाणारसार्वजनिक मालमत्तेचं नुकसान किंवा जिवीतहानी नसेल तर गुन्हे मागे घेतले जाणार
महत्वाचे बातम्या :