Onion Market: राज्यातील बाजारसमित्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी कांद्यासह लाल,पांढरा, नं 1, लोकल, पोळ, हालवा, चिंचवड जातीच्या कांद्याची मोठी आवक होत आहे. पणन मंडळाने (MSMB) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शनिवारी (22 फेब्रुवारी) रोजी 1 लाख 7 हजार 443 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. अकोल्यात कांद्याला सर्वाधिक भाव मिळत असून 3000 रुपये क्विंटल सर्वसाधारण भाव मिळाल्याचे सांगण्यात आले. लासलगावात शनिवारी 12 हजार 194 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. तर 349 क्विंटल उन्हाळी कांदा आला होता. शेतकऱ्यांना सर्वसाधारण 2400 रुपयांचा भाव मिळाला. (Onion Market Rates)

कुठे काय भाव मिळतोय कांद्याला?

राज्यातील कांदा बाजारात मागील काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी राज्यात एकूण 6,481 क्विंटल कांद्याची आवक झाली असून, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या बाजार समित्यांमध्ये दर ₹500 ते ₹2,350 च्या दरम्यान होते.

22 फेब्रुवारी रोजी राज्यातील एकूण आवक 1,37,443 क्विंटल होती. कोल्हापूर, नाशिक, पुणे, जळगाव आणि सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल झाला. नाशिकमध्ये उन्हाळी आणि लाल कांद्याचे दर ₹822 ते ₹2,595 पर्यंत होते. तर, अकोल्यात कांद्याला ₹2,500 ते ₹4,000 पर्यंतचा उच्चांकी दर मिळाला. 21 फेब्रुवारीला आवक अधिक होती. 2,53,540 क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला होता. नाशिक, पुणे, सांगली आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले. मात्र, 23 फेब्रुवारीला आवक घटली असून, दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.

तुमच्या बाजारसमितीत कांद्याला काय भाव मिळाला?

22/02/2025
अहिल्यानगर --- क्विंटल 1078 300 2600 1900
अहिल्यानगर लोकल क्विंटल 1625 300 2800 1550
अहिल्यानगर लाल क्विंटल 1657 1000 2485 2225
अहिल्यानगर उन्हाळी क्विंटल 2384 950 2401 2200
अकोला --- क्विंटल 475 2500 4000 3000
अमरावती लाल क्विंटल 593 500 2500 1500
चंद्रपुर --- क्विंटल 337 1500 2500 2000
छत्रपती संभाजीनगर --- क्विंटल 670 1000 3200 2100
धाराशिव लाल क्विंटल 51 1600 2500 2050
धुळे लाल क्विंटल 1620 450 2505 2000
जळगाव लाल क्विंटल 2581 1403 2300 1942
कोल्हापूर --- क्विंटल 6989 1000 3000 2000
कोल्हापूर लोकल क्विंटल 210 1800 3000 2600
नाशिक लाल क्विंटल 49591 822 2595 2217
नाशिक उन्हाळी क्विंटल 643 1301 2379 2176
नाशिक पोळ क्विंटल 22228 950 3152 2400
पुणे लोकल क्विंटल 678 2000 2767 2367
पुणे लाल क्विंटल 937 830 2600 2000
पुणे चिंचवड क्विंटल 25 2000 2500 2300
सांगली लोकल क्विंटल 7717 1200 2800 2000
सातारा हालवा क्विंटल 99 2000 3000 3000
सोलापूर लोकल क्विंटल 93 200 2700 2400
सोलापूर लाल क्विंटल 35162 200 3200 1800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 137443

हेही वाचा:

PM Kisan Scheme : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात 'या' दिवशी येणार, राज्यातील किती शेतकरी कुटुंबांना मिळणार लाभ?