पुणे : राज्यातील 9 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाने डिसेंबर महिन्यात विनापरवाना गाळप केल्यावरून दंड ठोठावला असून तो तब्बल 38 कोटी रुपये इतका आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 4 कारखाने, सातारा जिल्ह्यातील एक, सोलापूर जिल्ह्यातील 2 तर सांगलीतील 2 कारखान्यांचा समावेश आहे. जे साखर कारखाने एफआरपी पूर्ण देत नाहीत त्या साखर कारखान्याना पुढील हंगामात गाळप सुरू करता येत नाही. पण असे असतानाही विनापरवाना काही कारखान्यांनी कारखाने सूरु ठेवल्याने हा दंड साखर आयुक्तांनी ठोठावला आहे. 


महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र असून अनेक भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.  राज्यात साडे बारा लाख हेक्टर जमिनीवर 1 हजार 96 लाख टन उसाची लागवड करण्यात आली असून त्यापैकी 547 लाख टन उसाचे गाळप आज अखेर पूर्ण झाले आहे. दरम्यान काही साखर कारखान्यांनी विनापरवाना गाळप केल्याने त्यांना दंड ठोठावण्यात आला असून यामध्ये खालील कारखान्यांचा समावेश आहे.


1. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याला सर्वाधिक म्हणजे 7 कोटी 57 लाख रुपयांचा दंड 


2. सांगलीच्याच वाळवा तालुक्यातील पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी साखर कारखान्याला 4 कोटी 13 लाखांचा दंड 


3. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील  कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यास 6 कोटी 85 लाख रुपये 72 हजारांचा दंड 


4. इंदापूरच्या निरा भिमा कारखान्यास 1 कोटी 27 लाख 61 हजार रुपयांचा दंड 


5. छत्रपती सहकारी साखर कारखान्यास 2 कोटी 2 लाख रुपयांचा दंड  


6. शिरूर तालुक्यातील घोडगंगा कारखान्यास 2 कोटी 60 लाख रुपयांचा दंड 


7. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शरयू साखर कारखान्यास 6 कोटी 26 लाखांचा दंड 


8. सोलापूर जिल्ह्यातील इंद्रेश्वर शुगर मिल्स बार्शी या कारखान्यास 4 कोटी 79 लाखांचा दंड 


9. तर मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी साखर कारखान्यास 2 कोटी 64 लाखांचा दंड  


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha