Nanded News Update : बोगस बियाणांचे उत्पादन करून त्याची विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात कृषी विभागाने शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे. नांदेड शहरातील अर्धापूर रोड वरील एका गोदामात मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणांचे उत्पादन करत होती. कृषी विभागाने छापा टाकून या कंपनीचा भंडाफोड केलाय. या कंपनीत सोयाबीन, उडीद , हरभरा हा बियाणे तयार केली जात होती.


नांदेड शहरात एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर छापा टाकला. यावेळी  कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभऱ्याच्या बोगस बियाणांची पॅकिंग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामातील सर्व बियाणे जप्त करण्यात आले.  


बोगस बियाणे जप्त


छापा काकल्यानंतर गोदामात 100 क्विंटल सोयाबीन, 20 क्विंटल हरभरा , 100 क्विंटल उडीद, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन जप्त केले आहे. यावेळी कंपनीत 20 कामगार काम करत असल्याचे  आढळून आले आहे. त्यामुळे या कारमगारांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.  कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे.   


कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणलाय. या कंपनीत प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणे तयार केली जात होती. या कंपने या पूर्वी अशा किती बियाणांची विक्री केली आहे?  आणि अजून कोणत्या प्राकरचे बियाणे तयार केले जात आहे का? याची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगालावे यांनी दिलीय. 


मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री


छापा टाकण्यात आलेली ही कंपनी मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री करत होती. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड , बँग वरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे यांनी दिली आहे.  


दरम्यान, बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतोष गव्हाणे यांनी केलीय.


महत्वाच्या बातम्या


Farmers Protest : हरभरा खरेदी बंद केल्याने संताप; शेतकऱ्यांनी हरभरे शिजवून रस्त्यावर वाटले


Onino news : राहाता बाजार समितीत 'लूज कांदा' खरेदी, क्विंटलमागे शेतकऱ्यांचे 100 रुपये वाचणार