Cement Price Hike : घर बांधणे अथवा खरेदी करणे आणखी महागणार आहे. देशातील प्रमुख सिमेंट कंपनी  इंडिया सिमेंटने आपल्या सिमेंटच्या दरात प्रति गोणी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति गोणी 55 रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे. मात्र, ही दरवाढ टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले. 


कधीपासून वाढणार सिमेंटचे दर 


इंडिया सिमेंट कंपनी जून ते जुलै दरम्यान तीन टप्प्यांमध्ये  दरवाढ करणार आहे.  एक जून रोजी प्रति गोणी 20 रुपये, त्यानंतर 15 जून रोजी 15 रुपये आणि एक जुलै रोजी 20 रुपयांची दरवाढ करण्यात येणार आहे. 


कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी काय म्हटले?


कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन. श्रीनिवासन यांनी सांगितले की, कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन भांडवल उभारण्यासाठी काही जमीव विकणार आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आमच्याकडे जवळपास 26 हजार एकर जमीन आहे. या जमिनी वेगवेगळ्या श्रेणीतील आहेत. 


दरवाढ न केल्यास तोटा


इतर कंपन्यांकडून  दर कपात केली जात असताना तुम्ही सिमेंटचा दर का वाढवत आहात, असा प्रश्न श्रीनिवासन यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टींचे दर वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. आम्ही दरवाढ न केल्यास आम्हाला मोठा तोटा होईल असे श्रीनिवासन यांनी म्हटले. 


इंडिया सिमेंटचे आर्थिक निकाल


इंडिया सिमेंटचे आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये एकूण उत्पन्न 4,729.83 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये तिचे एकूण उत्पन्न 4,460.12 कोटी रुपये होते. मात्र, या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा झपाट्याने घसरून रु. 38.98 कोटी झाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: