Onion News : नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर (NAFED Chairman Jethabhai Ahir) यांनी अचानक नाशिक (Nashik) जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांवर धाड (Nafed onion buying and selling centers raid) टाकली. नाफेडच्या केंद्राना अचानक भेट दिल्यानं त्यांना गैरकारभार आढळून आला आहे. शेतकऱ्यांकडून (Farmers) कांदा खरेदी न करता बाजार समितीतून कांदा खरेदी केला जात असल्याचे आढळून आले
आहे. 


ऑनलाईन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा


ऑनलाइन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. कांदा प्रश्नांबाबतीत तक्रार करण्यात आली होती. कोणाला न सांगता अचानक भेट दिली आहे. विक्री केलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडावूनमध्ये आढळून आला आहे. आधीच काही शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करुन नाफेडकडून पैसे वसूल केले जातात. 5 ते 6 ठिकाणी चुकीच्या पध्दतीने काम सुरु असल्याचे आढळून आले आहे. 


लवकरच समिती स्थापन करणार, नाशिकमध्ये येऊन आढावा घेणार 


दरम्यान, कांदा खरेदी ही शेतकऱ्यांकडून केली जात नाही. नाफेड हे शेतकऱ्यांसाठी आहे पण तसे कामकाज दिसत नाही. शेतकऱ्यांच्या खतात पैसे जात नसल्याचेही समोर आले आहे. आधारकार्डवर शिक्के मारुन ऑनलाइन खरेदी विक्री व्यवहारात गडबड केली जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, यासंदर्भात लवकरच समिती स्थापन केली जाणार असून, समिती नाशिकमध्ये येऊन आढावा घेणार असून, त्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, दलाली होत असल्याचेही समोर आले आहे.


कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्यानं शेतकऱ्यांना फटका


शेतकऱ्यांना दुप्पट नफा देण्यासाठी नाफेडची स्थापना करण्यात आली आहे. मात्र वास्तवात तसे घडत नसल्याचा शेरा नाफेडच्या अध्यक्षांनी दिला आहे. कांदा खरेदी विक्री व्यवहारात दलाली होत असल्याने शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे. बाजार समितीतून कांदा माल खरेदी करणे अवघड आहे पण आम्ही, याबाबतीत विचार करत असल्याचे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर म्हणाले. 


बाजार समितीपेक्षा नाफेडचे कांद्याचे दर कमी


केंद्र सरकारच्या बफरस्टॉकसाठी शेतकऱ्यांकून (Farmers) खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे दर यापूर्वी नाफेडच्या (Nafed) स्थानिक अधिकाऱ्यांकडून ठरवले जात होते. मात्र, आता नाफेड कांदा खरेदीचे दर दिल्लीतून (Delhi) ठरणार आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा होणार असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पण, प्रत्यक्षात आजही बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला लिलावात मिळणाऱ्या दरापेक्षा नाफेडचे दर कमी 


महत्वाच्या बातम्या:


दिल्लीतून ठरलेले कांद्याचे दर कमीच, शेतकऱ्यांचा कांदा नाफेडला नाही, सध्या किती मिळतोय दर?