WTC Final 2023: आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल... WTCच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship Finals) टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) एकमेकांना भिडणार आहेत. दोन्ही संघ एकमेकांशी जरी भिडणार असले तरी खरी लढत मात्र दोन्ही संघातील महान खेळाडूंमध्ये रंगणार आहे. हे दोन खेळाडू म्हणजे, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ. बॅटिंग ऑर्डरमध्ये चौथ्या क्रमांकावर उतरणारे हे दोन दिग्गज फलंदाज आपापल्या संघाचा कणा आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसं पाहायला गेलं तर, या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावरच सामन्याचा निकाल ठरणार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओव्हलचं पीच आणि तेथील वातावरण लक्षात घेता, जर सुरुवातीचे दोन विकेट्स लवकर गेले, तर नंबर चारवर येणारा फलंदाज महत्त्वाची भूमिका निभावेल, एवढं मात्र नक्की. 

विराट पुन्हा फॉर्मात 

प्रतिस्पर्ध्यांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरणारं विराटचं वादळ पुन्हा एकदा फॉर्मात आलं आहे. याआधी खेळवण्यात आलेल्या WTC फायनल्समध्ये फारशी चांगली खेळी करू न शकलेला विराट, सध्या पुन्हा फॉर्मात आला आहे. एवढंच नव्हे तर विराटनं पुन्हा आपल्या बॅटमधून शतकं झळकावण्यास सुरुवात केली आहे. 

अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्यानं 186 धावांची शानदार खेळी केली. यानंतर आयपीएलमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली होती. यंदा आयपीएलमध्ये विराटनं दोन शतकं झळकावली. विराट पुन्हा फॉर्मात परतल्यानं ऑसी संघाची चिंता नक्कीच वाढली आहे.

ओव्हलवर धावांचा पाऊस पाडतो स्मिथ 

दुसरीकडे, ऑसी संघाच्या फलंदाजीचा कणा असलेला स्टीव्ह स्मिथ. ओव्हलवर स्मिथ जणू धावांचा पाऊसच पाडतो. स्मिथची कसोटी सरासरी 65 पेक्षा जास्त आणि टीम इंडियाविरुद्धची आठ कसोटी शतकं, आजच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांसाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकतात हे दिसून येतं. स्मिथचा विक्रम केवळ टीम इंडियाविरुद्धच नाही तर ओव्हलमध्येही उत्कृष्ट राहिला आहे. या मैदानावर त्यानं पाचपैकी दोन डावांत शतकं झळकावली आहेत. त्यामुळे विराट आणि स्मिथ या दोघांचीही फलंदाजी सामन्याची दिशा बदलण्यास निर्णायक ठरू शकते. 

इंग्लंडच्या ओव्हलवर विराट अन् स्मिथची आतापर्यंतची कामगिरी 

विराट कोहली  vs स्टिव्ह स्मिथ 
31 इनिंग्स 30
1033 रन 1727
33.33 एव्हरेज  59.55
149 हाईएस्ट  215
5 फिफ्टी 7
2 सेंच्युरी  6
4 शून्य  0

विराट कोहलीची WTC 2021-23 मध्ये कामगिरी 

कसोटी सामने : 16
आतापर्यंतच्या धावा : 869
एका सामन्यातील सर्वाधिक धावा : 186  
सरासरी : 32.18, 100/50- 1/3

स्टिव्ह स्मिथची WTC 2021-23 मध्ये कामगिरी

कसोटी सामने : 19
आतापर्यंतच्या धावा : 1252
सर्वाधिक धावा : 200* 
सरासरी : 50.08, 100/50- 3/6 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ajinkya Rahane WTC Final: अजिंक्य रहाणेसमोर 'करो या मरो'ची स्थिती; फ्लॉप ठरल्यास पुन्हा पत्ता कट