Raigad Farmers News : रायगड जिल्ह्यातील 26 हजारांपेक्षा जास्त शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Samman Nidhi Yojana) अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला अपात्र शेतकऱ्यांची यादी देण्यात आली आहे. तसेच अपात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 26 हजार शेतकऱ्यांकडून सुमारे 11 कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत. 


दरम्यान, केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या योजनेमुळे 2 हेक्टरपेक्षा कमी जमिन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना वार्षीक सहा हजार रुपये देण्यात येतात. यामध्ये, गेल्या दोन वर्षांपासून वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये दोन हजार रुपये प्रमाणे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. दरम्यान, कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला अपात्र शेतकऱ्यांची यादी पाठविण्यात आली असून, या अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम ही जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अपात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आदेशामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे 26 हजार 618 शेतकऱ्यांकडून  11 कोटी 47 लाख 32 हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.  तर यासाठी अपात्र शेतकऱ्यांना ही रक्कम सात दिवसात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


यामध्ये , प्राप्तिकर पात्र 4 हजार 509 शेतकऱ्यांचा समावेश असून, 22 हजार 109 शेतकरीही इतर कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर, शासनाच्या या वसुलीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षामध्ये केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 72 हजार 841 शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच त्यांच्या खात्यात वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तर, आज सुमारे दोन वर्षांनी या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना अपात्र ठरवून हे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: