मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या उन्हाचा कडाका (Heat Wave) प्रचंड वाढला आहे. कोकण किनारपट्टी भागात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट (Temperature Rise) देण्यात आला आहे. सध्या विदर्भातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता आहे. काही तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
आज संध्याकाळी पावसाची शक्यता
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे
हिंगोलीचे तापमान 41 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे हिंगोली चे जनजीवन विस्कळीत झाले आहे हिंगोली शहरांमध्ये एरवी गर्दी असणाऱ्या ठिकाणी सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय. तापमान वाढल्यामुळे शहरांमध्ये कामानिमित्त फिरणाऱ्या नागरिकांच्या जीवाची या उन्हामुळे लाही-लाही होत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास बाहेर फिरणाऱ्या सर्व नागरिकांनी रुमाल गमछा त्याचबरोबर महिलांनी स्कार्फचा वापर केल्याचे पाहायला मिळतंय, तर आवश्यकता नसेल तर दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.
वाढत्या तापमानाचा केळी पिकाला फटका
हिंगोली जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचलं आहे. त्यामुळे याचा फटका केळीच्या बागेवर पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतलं जातं परंतु या तापमानाचा फटका केळीच्या भागावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय उभे असलेले केळीचे झाडे तापमानामुळे सुकत आहेत तर तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नव्याने लावल्या केळीच्या बागांची झाडे वाळत आहेत या तापमानापासून बचाव करण्यासाठी अनेक शेतकरी विक्री लायक तयार झालेल्या केळीच्या फळांना कापड बांधून या उन्हापासून केळीच्या फळांचे संरक्षण करत आहेत.
महाराष्ट्रातील विविध भागातील तापमान