Kisan Sabha : अवकाळी पावसामुळं (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा अन्यथा मोठा एल्गार करणार असल्याचा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी राज्य सरकारला दिला. एका बाजूला शेतकऱ्यांचं (Farmers) नुकसान होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यकर्ते सत्ता संघर्षाची होळी खेळण्यात मशगुल असल्याची टीकाही अजित नवलेंनी केली आहे.


नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी


सध्या शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळ शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक वाया गेली आहेत. त्यामुळं नकुसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अन्यथा सरकारनं  संघर्षाला तयार राहावं असेही अजित नवले म्हणाले. काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कांदा काढला होता. तो कांदा बाजारात नेण्याच्या तयारीत शेतकरी होते. अशातच अवकाळी पावसानं आणि गारपीट पडल्यानं ते पीक हातचं वाया गेलं आहे. तसेच हरभरा आणि इतर पिकांवर अवकाळी पावसामुळं मोठं संकट कोसळलं आहे. आंब्याचा मोहोर आणि कैऱ्या झडून गेल्या आहे. एक मोठं संकट अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसमोर उभं राहिल्याचे अजित नवले म्हणाले.


अवकाळी पावसानं शेतातील पीक मातीमोल केलं


एकीकडे राज्यकर्त्यांच्या धोरणामुळं शेतीमालाला दर नाही. कांद्याला 2200 ते 2300 रुपये मिळाला पाहिजेत, त्या ठिकाणी केवळ 500 ते 600 रुपयांचा प्रतिक्विंटल दर शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. तसेच कापूस, सोयाबीन यांचे दर सातत्यानं कोसळत आहेत. त्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यतील शेतकरी चिंतेत आहेत. अशातच अवकाळी पावसानं होतं नव्हतं तेवढ मातीमोल केल्याचं अजित नवले म्हणाले. सरकारनं या स्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज होती. मात्र, शेतकरी सत्तासंघर्षाची होळी खेळण्यात मग्न असल्याचे अजित नवले म्हणाले. कोणता पक्ष कोणाचा, कोणत्या शाखेवर कोण कब्जा करणार यामध्ये कार्यकर्ते आणि नेते मश्गूल असल्याचे अजित नवले म्हणाले. त्यामुळं येत्या काळात मोठा एल्गार करणार असून, राज्यकर्त्यांची खुर्ची उचकटून देऊ असा इशारा किसान सभेनं दिला आहे.


अवकाळी पावसामुळं 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान 


अवकाळी पावसामुळं (Unseasonal Rain) राज्यातील 13 हजार 729 हेक्टरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. राज्यात आठ जिल्ह्यात या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शेतकरी नुकसानीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रम झाले होते. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी विधीमंडळात ही माहिती दिली. 


महत्त्वाच्या बातम्या:


Devendra Fadnavis : अवकाळीचा तडाखा, आठ जिल्ह्यात 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; फडणवीसांचं शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन