Maharashtra Wardha News: पारंपरिक बियाण्यांचं जतन करून विषमुक्त शेतीचा (Toxin-Free Agriculture) संकल्प सेवाग्राम (Sevagram) येथे आयोजित बीज उत्सवात (Sevagram Seed Festival) करण्यात आला आहे. वर्ध्याच्या (Wardha News) सेवाग्राम (Sevagram) येथील नई तालीम परिसरात शांती भवन येथे बीज उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रासह (Maharashtra News) देशातील विविध भागांतून शेतकरी (Farmers) आणि सामाजिक संघटना (Social Organization) या उत्सवात सहभागी झाल्या आहेत. येथे लावलेल्या प्रदर्शनातील पारंपरिक बियाणं (Traditional Seeds) देखील आकर्षणाचा केंद्र ठरले आहेत. 


उत्पादन खर्चात घट करण्यासाठी सेंद्रिय शेती (Organic Farming) हाच एक चांगला पर्याय आहे. चांगल्या आरोग्यासाठी (Health) विषमुक्त शेती (Farming) फायद्याची ठरत आहे. त्यासाठी सेवाग्राम येथे नई तालीमसह विविध सामाजिक संघटनांनी एक संघ तयार करून बीज उत्सवाचं आयोजन केलं आहे. या बीज उत्सवात विदर्भ, मराठवाडा, सिंधुदुर्ग, कर्नाटक, इंदोर येथील शेतकरी तसेच संघटना सहभागी झाल्या. जल संवर्धन, बीज संवर्धन, तेल स्वराज्य अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केलं आहे. यावेळी पारंपरिक बीज जे आहे, ते वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाऊ शकतं. बीज गोळा करण्याच्या पद्धतीमध्ये सुदृढ बियाणं कसं तयार करायचं याचे प्रशिक्षण आवश्यक आहे. चांगल्या बीजांमध्ये त्यांची उत्पादकता किती आहे? हे तपासले पाहिजे आणि त्या-त्या परिसरासाठी ते बीज वापरले गेले पाहिजे, असंही मंथन झालं आहे.




शेतकरी (Farmers News) हा बियाण्याच्या (Seeds) बाबतीत देखील गुलाम होत आहे. स्वतः बियाणं तयार करून शेतकरी पैसे वाचवू शकतो. जर शेतकऱ्यानं बियाणं, खतं आणि शेतीसाठी लागणारे सर्व काही विकतच घेण्याचा प्रयत्न केला, तर शेतकऱ्याला उरेल काय? असा प्रश्न निर्माण होतो. शेतकऱ्यानं आपल्या बियाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालं पाहिजे, खतांच्या बाबतीत स्वावलंबी झाले पाहिजे, शेतीपिकाचे भाव शेतकऱ्यांना ठरविता आले पाहिजे यासाठी प्रयत्नांची गरज आहे. मध्य प्रदेशातील इंदूरच्या आदिवासी भागात अल्पशा शेतीमध्ये बीज निर्मितीचा प्रयत्न सुभद्रा खापर्डे या शेतकरी महिलेकडून होत आहे. सेवाग्राम येथे आयोजित बीज प्रदर्शनात या महिलेनं आपला स्टॉल लावला आणि तेवढाच तो आकर्षक देखील ठरला आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Agriculture News : मार्चमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटींची भरपाई, वाचा कोणत्या विभागात किती निधी?