Farmers will get free electricity : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar)  यांनी अर्थसंकल्पात (Budget) विविध योजनांची घोषणा केली आहे. यामधील महत्वाची घोषणा म्हणजे आता शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. यासाठी सरकार मागेल त्याला  सौरऊर्जा पंप देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या योजनेमुळं राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. 


अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती


शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरऊर्जा करून करण्याचा 15000 कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना मोफत वीज व्हावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देण्यात येईल. 


कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार


राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर असल्याचे सांगत ई पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू केली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयांत पिक विमा देण्याची योजना कायम असणार आहे. तर, गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येत आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 5 हजार रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे.


मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत


महिलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना स्वच्छ इंधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली जात आहे. या योजनेतंर्गत पात्र कुटुंबाना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जातील. राज्यातील  52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल.  मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क  व परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के माफी देण्यात येणार असल्याचे अजित पाव म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपाचं थकीत वीज बिल माफ, राज्यातील किती शेतकऱ्यांना होणार फायदा?