Pune Agriculture News: मागील वर्षी अतिवृष्टीमुळं (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला होता. दरम्यान, पुणे (Pune) जिल्ह्यातही गतवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं आणि फळपिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामध्ये 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीनं करण्याची कार्यवाही सुरु झाली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली. 


कोणत्या तालुक्यात किती बाधित गावे


भोर तालुका 


बाधित गावे 78, शेतकरी 523, बाधित क्षेत्र 165.66 हेक्टर, नुकसान भरपाई- 23 लाख 10 हजार.


वेल्हा तालुका


बाधित गावे 2, शेतकरी 11,  क्षेत्र 1.2 हेक्टर,  नुकसान भरपाई- 39 हजार रुपये


मावळ 


बाधित गावे 7, शेतकरी 114, क्षेत्र 24 हेक्टर, नुकसान भरपाई- 3 लाख 26 हजार.


हवेली


बाधित गावे 104, शेतकरी 7 हजार 490, क्षेत्र 3146.19 हेक्टर, नुकसान भरपाई- 8 कोटी 33 लाख 2 हजार, 


खेड


बाधित गावे 34, शेतकरी 1 हजार 947, क्षेत्र 1081.41 हेक्टर, नुकसान भरपाई- 2 कोटी 2 लाख 23 हजार रुपये. 


आंबेगाव 


बाधित गावे 89, शेतकरी 9 हजार 779, क्षेत्र 2646.85 हेक्टर,  नुकसान भरपाई- 4 कोटी 96 लाख 69 हजार, 


जून्नर 


बाधित गावे 176, शेतकरी 22 हजार 591,  क्षेत्र 14 हजार 556.35 हेक्टर, नुकसान भरपाई- 24 कोटी 51 लाख 46 हजार 


शिरुर 


बाधित गावे 67, शेतकरी 4 हजार 734, क्षेत्र 1 हजार 969.54 हेक्टर नुकसान भरपाई 4 कोटी 56 लाख 66 हजार रुपये, 


पुरंदर 


बाधित गावे 146, शेतकरी 27 हजार 841, क्षेत्र 9 हजार 332.40 हेक्टर, नुकसान भरपाई- 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये.


दौंड


बाधित गावे 30,  शेतकरी 2 हजार 8, क्षेत्र 818.57 हेक्टर, नुकसान भरपाई- 2 कोटी 14  लाख 80 हजार 


बारामती


बाधित गावे 101, शेतकरी 8 हजार 417, क्षेत्र 3480.28  हेक्टर, नुकसान भरपाई 5 कोटी 52 लाख 20 हजार रुपये अशी एकूण 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम आहे.


याव्यतिरिक्त जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी 3 कोटी 14 लाख 31 हजार रुपये देण्यात आले आहेत. तर शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी 13 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Aurangabad News: अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडले; वैजापूर तहसीलदारांना मिळाली नोटीस