Sadabhau Khot on Shivsena : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. कोकणानं शिवसेनेला भरभरुन दिलं पण शिवसेनेनं काय दिलं? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी सेनेला केला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या लेकाला पर्यावरण मंत्रीपद दिलं आणि स्वतःच्या घरचं भलं केलं. आता तरी कोकणातील आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचं भलं करा, असेही खोत यांनी म्हटले आहे.
सध्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांची 'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राचा' हा राज्यव्यापी दौरा सुरु आहे. 29 एप्रिलपासून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरुन या दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी सदाभाऊ खोत यांच्याबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित आहेत. सध्या राज्यातील शेतकरी, शेतमजुरांचे,तरुणांचे व्यवसायिकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रशांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले आहे.
शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे प्रकल्प अर्धवट
दरम्यान, सदाभाऊ खोत हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ताम्हाणे गावातील काही ग्रामस्थ भेटायला आले. त्यांनी मला त्यांच्या ताम्हाणे पहिली वाडी येथील अर्धवट बांधकाम होऊन थांबलेल्या धरणाची माहीती दिली. त्यानंतर तत्काळ या धरणाची पाहणी केली. लोकांच्या करांमधूनच शासन धरणांसारखे प्रकल्प उभा करत असते. शासन त्याच्यावर करोडो रुपयांचा निधी खर्च करत असते. परंतू असे प्रकल्प जर अर्धवट स्वरुपात राहिले, तर त्यावर खर्च केलेल्या निधीचा चुराडा होतो असे खोत यांनी म्हटले आहे. भविष्यात तोच प्रकल्प पुन्हा नव्याने वाढीव अंदाजपत्रक करुन निधी उभारुन करावा लागतो. ताम्हाणे धरण जवळजवळ 20 ते 21 मंजुर होऊन देखील शासनाकडून निधी न मिळाल्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्वरुपात धुळ खात पडला आहे. या धरणाला भेट देऊन त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करुन त्याला निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले यावेळी शेतकऱ्यांना दिल्याचे खोत यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: