Ajit Nawale on Radhakrishna Vikhe Patil : राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेलं नाही. अशातच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची एक जाहीरात प्रसिद्ध होत आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकीर श्रीमंत होणार, मार्चअखेर दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. याच मुद्यावरुन किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit Nawale) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. विखे पाटलांचा हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचे नवले म्हणाले. 


...तर यापेक्षा खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट नाही


दुधाचे अनुदान देण्याची घोषणा सरकारनं केली आहे मात्र, अटी शर्ती व ऑनलाइन डेटाच्या जटीलतेमुळं शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयाच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही असे अजित नवले म्हणाले. राज्यातले सरकार आणि दुग्धविकास मंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा असल्याचे अजित नवले म्हणाले.


दूध उत्पादक शेतकरी संकटात 


दरम्यान, सध्या दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. कारण दुधाच्या दरात घसरण झाली आहे. दुधाच्या दरात घसरण झाल्याच्या मुद्यावरुन वेळोवेळी किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीनं आवाज उठवला होता. त्यानंतर सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेलं नाही. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे अनिदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बोलेलं जात आहे. याचीच एका जाहीरात अहमदनगर जिल्ह्यातील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालीय. याच मुद्यावरुन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केलीय. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र, अद्यापही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदना जमा झाले नाही. त्यामुळं किसान सभेचे नेते अजित नवलेंनी मंत्री विखे पाटलांवर टीका केलीय. 


महत्वाच्या बातम्या:


महानंदा NDDB ला देण्याच्या हालचाली तीव्र, कराराचा मसुदा सार्वत्रिक करा; किसान सभेची मागणी