बदायू (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (21 मार्च) बदायू दुहेरी हत्याकांड प्रकरणी (Badaun double murder) दुसऱ्या आरोपीला अटक केली. दुसरा आरोपी मोहम्मद जावेदला बरेली येथून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जावेद सुरुवातीला दिल्लीला पळून गेला पण नंतर त्याला बरेलीमध्ये अटक करण्यात आली. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये जावेद आत्मसमर्पण करण्यासाठी बरेलीला आल्याचे सांगत आहरे. तो म्हणतो की, मी दिल्लीला पळालो आणि तेथून (बदायूमध्ये मला आत्मसमर्पण करण्यासाठी बरेलीला आलो आहे. माझ्या भावाने काय केलं याबद्दल मला लोकांचे फोन आले आहेत. 


जावेदवर 25 हजारांचे बक्षीस 


दोन मुलांची हत्या केल्यापासून जावेद फरार होता. पोलिसांची शोधमोहिम सुरु असतानाही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. जावेदची माहिती देणाऱ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. गुन्ह्यानंतर जावेदने मोबाईल बंद करून दिल्लीला पळून गेल्याची चर्चा होती. दिल्लीहून परतल्यावर बरेलीमध्ये आत्मसमर्पण करण्याचा विचार जावेदने केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी रात्री उशिरा त्याला सॅटेलाइट बसस्थानकात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर, बरेली पोलिसांनी जावेदला पुढील कारवाईसाठी बदायू पोलिसांच्या ताब्यात दिले.






अन्य आरोपी साजिद चकमकीत मारला गेला


बदायू दुहेरी हत्याकांडातील आरोपी साजिद हा याआधी मंगळवारी (19 मार्च) रात्री पोलिसांनी चकमकीत मारला गेला. केश कर्तनालय दुकान सुरु केलेल्या तीन भावांवर साजिदने आयुष (12), अहान उर्फ हनी (8) आणि युवराज (10) यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात आयुष आणि अहान यांचा मृत्यू झाला, तर युवराजला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर साजिदच्या दुकानाला आग लावण्यात आली. जवळपासच्या काही दुकानांची आणि वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी आरोपीचे वडील आणि काका यांना ताब्यात घेतले होते. तथापि, पोलिसांनी या घटनेमागील हेतूला दुजोरा दिला नव्हता. 


इतर महत्वाच्या बातम्या