PM Modi : भूमीहीन शेतकऱ्यांचा विचार करुन शाश्वत आणि समावेशक अन्न प्रणाली तयार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जी - 20 देशांना केले.  जी - 20 कृषीमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. सध्याची जागतिक पुरवठा साखळी साथरोगामुळं विस्कळीत झाली असून भौगोलिक - राजकीय तणाव आहे. हवामान बदलाच्या प्रभावामुळं त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळं मृदा आरोग्य, पिकांचे आरोग्य, आणि उत्पन्न वाढेल अशा पद्धती अवलंबण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केलं. संशोधन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले शेतकरी सक्षम होतील असेही ते म्हणाले. 


 या चार क्षेत्रांवर भर 


मानवी सभ्यतेच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र असल्याची बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करुन मानवतेच्या भवितव्यात सुधारणा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी जी-20 कृषीमंत्र्यांना केले.  जी - 20 कृषीमंत्र्यांच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेसाठी अ) अन्न सुरक्षा आणि पोषणात वाढ करण्यासाठी कृषी विविधतेला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षा प्रणालीत सुधारणा ब) हवामान - अनुकूल तंत्रज्ञानाला अर्थपुरवठा आणि शाश्वत कृषी उत्पादनासाठी कृषी प्रणाली मॉडेलवर आधारित क्लायमेट-स्मार्ट दृष्टीकोनाचा अंगिकार  क) लहान आणि भूमीहीन शेतकरी, महिला आणि युवा वर्ग यांच्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करणे आणि समावेशक कृषी मूल्य साखळ्या आणि साखळ्यांची प्रतिरोधक्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी वाढत्या आर्थिक संधींचा वापर करणे ड) कृषी क्षेत्राचे परिवर्तन घडवण्यासाठी डिजिटायजेशनमध्ये सुधारणा करणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेणे आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा एक भाग असलेल्या कृषी डेटा मंचाच्या प्रमाणीकरणावर भर देणे, या चार प्राधान्यक्रमांच्या क्षेत्रांवर भर दिला आहे.


2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आहे. भरड धान्ये ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. इतकेच नाही तर ती उत्पन्नात विविधता निर्मितीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका साध्य करण्यास मदत करत आहेत. प्राचीन भरडधान्ये आणि तृणधान्ये यांच्या लागवडीसंदर्भातील सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान यांची परस्पर देवाणघेवाण करण्याबाबत भारताची वचनबद्धता असल्याचे पंतप्रधान म्हणाले.  सध्याची जागतिक पुरवठा साखळी साथरोगामुळे विस्कळीत झाली असून भौगोलिक - राजकीय तणाव आणि हवामान बदलाच्या प्रभावामुळे त्यात आणखी भर पडली असल्याचे पंतप्रधान म्हणाले.


शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी प्रयत्न 


अन्न सुरक्षा आणि पोषणाबाबत भारताचा दृष्टीकोन 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हा असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या वचनबद्धतेचा अर्थात उपासमार संपवणे, तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा प्राप्त करणे या गोष्टींचाही कृषीमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News: पेरलेला भात उगवेल का? कोकणातील बळीराजा चिंतेत, पाऊस नसल्यानं शेतीचं कामं खोळंबली