Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Hingoli Market committee) मोंढा २५ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यानच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असून जवळपास नऊ दिवस मोंढा बंद (Mondha Closed) राहणार असल्याने सोमवारी हळदीची आवक वाढली होती. दरम्यान आज दुपारी एक वाजेपर्यंत हळद स्वीकारली जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली होती. २२ जुलै सोमवार पासून शेतीमाल भुसार हा सोमवारी, बुधवार, शुक्रवार या प्रमाणात शेड क्रमांक ३ मध्ये उतरविला जात असून २५ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत नऊ दिवस मोंढ्यातील खरेदी- विक्री बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवार व बुधवार हे दोन दिवस भुसार माल शेतकऱ्यांना विकता येणार नाही.
आज दुपारी १ वाजेपर्यंत हळदीची आवक स्विकारली जाणार
सोमवारी संत नामदेव हळद मार्केटमध्ये १५० वाहनातुन २५०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. भुसार मार्केटमध्ये ३०० पोते गव्हाला २१०० ते ३००० हजार रुपये दर मिळाला. १५० पोत्यातुन हरभऱ्याला ६ हजार ते ६५०० रुपये दर मिळाला. तर ७०० ते ८०० पोत्यातुन सोयाबीनची आवक झाली. त्याला ४३०० ते ४४५० रुपये भाव मिळाला.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार माल विकण्यासाठीचा मोंढा बाजार नऊ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून हिंगोलीत हळदीची आवक काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
हळदीला काय मिळतोय भाव?
पणन विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हिंगोलीत 3000 क्विंटल हळदीची आवक झाली होती. तर 1257 लोकल हळकुंड विक्रीस आणले होते. शेतकऱ्यांना क्विंटल मागे मिळणारा भाव आता घटना असून 17 ते 18 हजार रुपये क्विंटल असणारा भाव आता 14300 रुपयांवर येऊन थांबला आहे.
काही दिवसांपूर्वी हळदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसून आले. राजापुरी हळदी सह लोकल हळदीचा भावही सात ते आठ हजारांवर घसरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, हिंगोलीत आता नऊ दिवस मोंढा बंद राहणार असल्याने हळदीची आवक वाढली असून क्विंटलमागे मिळणाऱ्या भावात काहीशी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.