Heligan Pineapple: एक अननस पिकवण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. हे अननस ब्रिटनच्या हेलिगनमधील द लॉस्ट गार्डनमध्ये पिकवले जाते. हे अननस तयार होण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षे लागतात. हे अननस बाजारात विकले जात नाही, तर लोक भेट देण्यासाठी या अननसाची खरेदी करतात. हे अननस जगातील तिसरे सर्वात महाग फळ आहे.


हेलिगन अननसाची शेती कशी केली जाते?


हेलिगन अननस पिकवण्यासाठी एक लाख रुपयांचा खर्च येतो. हे पिक वाढवण्यासाठी घोड्याचे खत वापरले जाते. हेलिगन अननस लाकडी भांड्यात लावले जाते. या भांड्यांची रचना वेगळ्या पद्धतीने केली जाते. एका भांड्यातून फक्त एकच अननस तयार होऊ शकते, जे परिपक्व होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात. हेलिगन अननसाचा खुल्या बाजारात लिलाव केला तर हे फळ 10 लाख रुपयांना विकले जाईल असे सांगण्यात आले आहे. उष्णतेसाठी पिकाचं संरक्षण व्हावं म्हणून अननसावर आवरण घातले जाते. तसेच पिकाच्या पोषणासाठी घोड्याचे खत टाकले जाते. 


हेलिगन अननसाच्या लागवडीसाठी एक लाख रुपयांचा खर्च 


हे फळ तयार करण्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. ते खुल्या बाजारात विकले जात नसल्याचे सांगण्यात येते. बहुतेक हायप्रोफाईल लोक ते गिफ्टिंगसाठी विकत घेतात, परंतु जर त्याचा लिलाव झाला तर अननसाची किंमत सुमारे 10 लाख रुपये असेल.


हेलिगन अननस जगातील तिसरे सर्वात महाग फळ


एवढी मोठी किंमत असतानाही हे फळ जगातील तिसरे महागडे फळ असल्याचा दावा केला जात आहे. सध्या रुबी रोमन द्राक्ष हे जगातील सर्वात महागडे फळ समजले जाते. हेलिगन अननस हे फळ 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणले गेले. हेलिगनमधील गार्डन्सला प्रथम हे फळ भेट देण्यात आले. त्यानंतर त्याची लागवड सुरू करण्यात आली. Heligan.com वर दिलेल्या माहितीनुसार, हे फळ राणी एलिझाबेथ यांना भेट म्हणून देण्यात आले होते. 


महत्त्वाच्या बातम्या:


Success Story : डाळिंब शेतीतला 'प्रताप', दोन एकरात घेतलं 30 लाखांचं उत्पन्न