Sangli News : कांद्याचा भाव मातीमोल झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात सध्या कांद्याच्या गडगडलेल्या दरामुळे कांद्यावरून राजकारण पेटले आहे. कांद्याला कवडीमोल दर मिळत असतानाच सांगलीतील (Heavy Wait Onion in Sangli) एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी घेतलेल्या कांद्याच्या पीकात एक कांदा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे. हा कांदा पाहण्यासाठी शिरगावे यांच्या शेतात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेतात कांदा पाहण्यासाठी आलेले लोक कांद्याला पाहून हा कांदा आहे की कांदोबा असे आपसूक बोलत आहेत.


त्यामुळे राज्यात सध्या गडगडलेल्या दरामुळे कांदा चांगला चर्चेत आला आहे. त्याच बाजूला सांगलीच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मात्र कौतुक होत आहे. कारण कांदा उत्पादक शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. विशेष म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे. सरासरी 700 ते 800 ग्रॅम इतक्या वजनाचा कांदा पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील शेतकरी हनुमंत शिरगावे यांच्या शेतीत (Heavy Wait Onion in Sangli) पीकला आहे.


दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा पाणी आणत आहे. 500 किलो कांदा विकून हातात दोन रुपये हातात आल्याने कांदा उत्पादक शेतकरी भलताच अडचणीत आला आहे. त्यामुळे कांद्यावरून राजकारण देखील पेटले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कांद्यावरून आरोप प्रत्यारोप करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या