Baramati Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली. बारामतीमधील पश्चिम भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं असून, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, नीरा-बारामती रस्त्यावरील पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेला असून, हलक्या वाहनांची वाहतूक ठप्प करण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर आणि निंबुत भागात हा जोरदार पाऊस बरसला आहे. या पावसामुळं शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे. या पाण्यामुळं पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, या मुसळधार पावसामुळं नीरा-बारामती रस्त्यावरील पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळं या रोडवरील वाहतुक ठप्प करण्यात आली आहे. नीरा-बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उद्यापासून (8 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. गेली काही दिवस पावसानं उघडीप दिली होती. मात्र, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह ठाणे परिसारत पावसानं चांगली हजेरी लावली आहे. लांबलेल्या पावसामुळं खरीप पिके धोक्यात आली होती, मात्र, पावसामुळं पिकांना जीवदान मिळालं आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे, तर काही ठिकाणी मात्र, पावसाची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात सुरुवातील पावसानं थैमान घातलं होतं. मात्र, तिथे गेल्या 20 ते 25 दिवसापासून पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांची पिकं धोक्यात आली आहे. तेथील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: