Hapus Mango News : जगप्रसिद्ध अशा हापूस आंब्याची किंमत सध्या स्थानिक बाजारात पडलेली दिसून येत आहे. सध्या हापूस आंब्याची 150 ते 300 रुपये प्रति डझन या दराने स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. यंदा सुरुवातीला आंबा कमी प्रमाणात बाजारात दाखल झाला म्हणून दर चढा होता. पण आता शेवटच्या टप्प्यातील हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्याने दर कमी झाला आहे. सध्या हापूस ग्राहकांना घेण्यास परवड असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसताना दिसत आहे.
शेतकरी नेमकं काय म्हणाले ते पाहुयात
सुरुवातीला बाजारपेठेत हापूस आंब्याला चांगला दर मिळाला. मात्र, त्यावेळी माल जास्त नव्हता. आता आमच्याकडे हापूस आंबा आहे तर बाजारपेठेत दर कमी मिळत असल्याची प्रतिक्रिया आंबा उत्पादक शेतकरी राजन कदम यांनी दिली. दर खूप कमी मिळत आहेत. एवढे कमी दर मिळतील अशी अपेक्षा नव्हती. उत्पादन खर्च खूप वाढला आहे. अशातच दर कमी होत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यावर्षी आंबा उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत होणार असल्याचे ते म्हणाले. कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. आंबा जर 500 रुपये डझनने विकला नाहीतर खूप मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्पादन खर्च निघणार नाही. 200 ते 300 रुपयांचा दर परवडत नसल्याचे कदम म्हणाले. खतांच्या, औषधांच्या किंमतू खूप वाढल्या आहेत, सरकारने त्याकडे जरा लक्ष द्यावे असेही ते म्हणाले. 80 ते 90 टक्के आंबा उत्पादक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली जाण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: