Mango Price News: आंध्र प्रदेश सरकारनं (Government of Andhra Pradesh) मोठा निर्णय घेतला आहे. आंब्याची पिकासाठी (Mangp Crop) हमीभाव (MSP) जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना प्रतिटन आंब्यासाठी 30000 रुपये मिळमार आहेत. आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि तिरुपती जिल्ह्यांतील आंबा उत्पादक त्यांच्या उत्पादनाला वाजवी दर मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. अखेर याठिकाणी तोतापुरी जातीच्या आंब्यासाठी प्रति टन 30,000 रुपये किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं बोलंल जात आहे. 


विविध संकटामुळं पीक उत्पादनात लक्षणीय घट


तोतापुरी जातीसाठी काही व्यापारी केवळ 20 हजार रुपये प्रतिटन दर देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ते विविध खर्चासाठी अतिरिक्त 12 टक्के कपात करत आहेत. या व्यापाऱ्यांनी मोठमोठी संकलन केंद्रे उभारून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. अशा किंमतीतील फेरफारामुळे अनेक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. हे शेतकरी प्रामुख्याने तोतापुरी जातीची लागवड करतात. त्यांना योग्य परताव्याची अपेक्षा होती. परंतु पीक उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. त्याचवेळी आंबा शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन चित्तूर आणि तिरुपतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फलोत्पादन आणि पणन अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी तोतापुरी आंब्याची किमान किंमत 30,000 रुपये प्रति टन निश्चित केली आहे,. 


किंमती घसरल्यानंतर शेतकऱ्यांना बसत होता मोठा फटका 


मजूर, खते आणि वाहतुकीचा खर्च लक्षात घेता प्रति टन 30,000 रुपये किंमत चांगली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परंतू किंमती घसरल्यानंतर आम्हाला मोठा तोटा सहन करावा लागत होता असे शेतकरी म्हणाले.


तोतापुरी आंब्याचा दर काय? 


तोतापुरी जातीसाठी काही व्यापारी केवळ 20 हजार रुपये प्रतिटन दर देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ते विविध खर्चासाठी अतिरिक्त 12 टक्के कपात करत आहेत. फलोत्पादन किंवा पणन विभाग हस्तक्षेप करत नसल्याने या व्यापाऱ्यांनी मोठी संकलन केंद्रे उभारली असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे संभाव्य नुकसान आणि रोगराई पसरण्याची भीती वाढली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.


महत्वाच्या बातम्या: 


नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय, 2 महिन्यातच ऑनलाईन आंबा विक्रीतून शेतकरी लखपती