Agriculture News : सध्या राज्याच्या विविध भागात चंगला पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेतीचंही नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे सध्या सुरु असणाऱ्या पावसामुळं कोकणात शेतीच्या कामांना वेग आला आहे. सध्या कोकणातील शेतकरी भात लागवडीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे. भात लागवड करताना शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर केला जात आहे.
चांगला पाऊस झाल्यामुळं कोकणातील शेती कामांना वेग आला आहे. भात लागवडीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. ग्रामीण भागात देखील आता शेतकरी आधुनिक यंत्रच्या साथीने शेती करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात प्रथमच भात लावणी यंत्राचा वापर करुन भात लागवड करण्यात येत आहे. ही सुरुवात तालुक्याच्या कृषी क्षेत्रासाठी महत्वाची आहे. सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक शहरांकडे वळत आहेत. त्यामुळं मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.
दरम्यान, तुळशी गावातील शेतकरी राहुल देशमुख यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील शेतात या यंत्राचे प्रात्यक्षिक केले. सध्या शेतीच्या कामांसाठी असणाऱ्या मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यामुळं शेतकरी आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. मनुष्यबळाची वानवा असणाऱ्या मंडणगडमध्ये शेतकऱ्यांना हे आधुनिक यंत्र फायदेशीर ठरणार आहे. या यंत्रामुळं उखळणी, चिखळणी यासाठी लागणारे मनुष्यबळ यावर होणाऱ्या खर्चात कपात होणार आहे. पेरणीपासून लावणीपर्यंत मशीनद्वारे 7 ते 8 हजारांचा खर्च होतो. मंडणगड तालुक्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झाल्याने शेती ओस पडली आहे. मनुष्यबळाची वानवा असल्याने शेतीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळं शेतात यांत्रिकीकरणाचा वापर होत असल्याचे चित्र दिसत आहे. भात लावणी यंत्राचा वापर हा तालुक्यासाठी आश्वासक आहे. कारण मजुरीच्या खर्चात बचत तसेच वेळेची बचत यामुळं होणार आहे. तसेच भात क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Government scheme : शेतीमध्ये हरितगृह उभारणी, फलोत्पादन यांत्रिकीकरण, प्लॅस्टिक मल्चिंग आदींसाठी अनुदान हवाय? आजच येथे करा अर्ज
- Pune rain : राज्यातील शेतकरी चिंतेत, मावळमधील मात्र आनंदी, तुफान पावसात भात लागवडीला वेग