Mumbai University Exams 2022 : मुंबईत सध्या गेले काही दिवस सलग मुसळधार (Heavy Rain) पाऊस पडत आहे. याच कारणास्तव मुंबई विद्यापीठाला परीक्षा रद्द करावी लागली होती. तर अतिवृष्टीमुळे रद्द कराव्या लागलेल्या पेपरच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 


कोणत्या दिवशी कोणत्या विषयाचा पेपर?


मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. नवीन वेळापत्रकानुसार, 14 जुलैच्या रद्द झालेल्या परीक्षा आता 18 आणि 19 जुलै 2022 रोजी घेतल्या जाणार आहेत. मुंबई विद्यापीठ परीक्षा 2022 नवीन वेळापत्रकात अभियांत्रिकी, फार्मसी आणि एसएससी फायनान्सच्या एकूण 9 विषयांचे पेपर पुन्हा घेण्यात येतील. कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस कम्युनिकेशन एथिक्स-I, फायनान्शिअल अकाउंटिंग अँड मॅनेजमेंट, एंटरप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट, ईआरपी, एथिक्स आणि सीएसआर, फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजसाठी 18 जुलै (सोमवारी) रोजी परीक्षा घेतली जाईल. आणि क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी या विषयांची परीक्षा 19 जुलै (मंगळवारी) होणार आहे.


परीक्षा केंद्रे जुनीच राहतील


हवामानामुळे या परीक्षांच्या तारखा निश्चितच बदलाव्या लागल्या, मात्र परीक्षा केंद्रात कोणताही बदल होणार नाही. असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. परीक्षा केंद्र जुनेच राहील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सतत पाऊस पडत आहे. अनेक क्षेत्रे रेड आणि ऑरेंज झोनमध्ये घोषित करण्यात आली आहेत. पुणे, लातूर आणि इतर शहरांमध्ये शैक्षणिक संस्था बंदची घोषणा करण्यात आली आहे. तर लातूरमधील शाळा शुक्रवार आणि शनिवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका
मुंबई विद्यापीठाच्या नव्या परीक्षा वेळापत्रकाबाबत सोशल मीडीयावर विविध दिशाभूल करणारे संदेश आणि माहिती फिरवली जात आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मुंबई विद्यापीठाने पाठवलेली माहितीच खरी मानावी. असे आवाहन करण्यात आले आहे


संबंधित बातम्या


Mumbai University : विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाच्या जागा भरल्या, CBSE विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त जागा वाढवणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI