Agriculture News : गव्हाच्या किमती (wheat price) कमी झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिवांनी घेतली राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गहू आणि तांदळाच्या किमती आटोक्यात राहाव्यात आणि बाजारात त्याची सहज उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सचिव संजीव चोप्रा यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गहू साठा मर्यादा आदेश आणि त्याची पूर्तता यावर देखील चर्चा करण्यात आली.
किमती आटोक्यात आणि साठेबाजीला आळा घालणे हा उद्देश
केंद्र सरकारने घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठी साखळी असलेले किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योजक यांना लागू असलेली गहू साठा मर्यादा जारी केल्याच्या एक दिवसानंतर ही बैठक झाली. खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत (देशांतर्गत ) गहू आणि तांदूळ आणण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. किमती आटोक्यात ठेवणे आणि साठेबाजीला आळा घालणे हा या या उपायांचा उद्देश आहे .
कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि गव्हाच्या उपलब्धतेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, मोठी साखळी असलेले किरकोळ विक्रेते आणि प्रक्रिया उद्योजक यांच्याकडून गव्हाच्या साठ्याची माहिती घेण्यास सांगितले आहे. माहिती भरणे सुलभ व्हावी यासाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर (https://evegoils.nic.in/wsp/login) माहिती सादर करण्यासंबंधी एक वापरकर्ता नियमावली (युजर मॅन्युअल) राज्य सरकारसोबत सामायिक केली गेली आहे. संबंधितांकडे असलेला साठा विहित मर्यादेपेक्षा अधिक असेल तर त्यांनी ही अधिसूचना जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत साठा विहित मर्यादेपर्यंत आणणे आवश्यक आहे.
गहू आणि तांदळाच्या किमती कमी होण्याची शक्यता
गहू आणि खुल्या बाजारात विक्री योजनेअंतर्गत तांदूळ आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली. या निर्णयामुळे गहू आणि तांदळासह त्यापासून निर्माण होणाऱ्या उत्पादनांच्या वाढत्या किंमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. गहू आणि तांदूळ यासारखी धान्ये ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध व्हावीत, हे सुनिश्चित करण्यासाठी ही पावले उचलली जात आहेत.
यावर्षी गहू खरेदीत मोठी वाढ
हरियाणा आणि पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गहू खरेदी केल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही पाठवले जात आहेत. राज्यात गव्हाचा एमएसपी 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचबरोबर पंजाबमध्ये यंदा गहू खरेदीत 7 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातही गव्हाची खरेदी वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Wheat Procurement : गहू खरेदीत 42 टक्क्यांची वाढ, पंजाब हरियाणा आघाडीवर; काही भागात अवकाळीचा फटका