Rabi Season : शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने यंदा हरभऱ्यासाठी 5 हजार 230 चा हमीभाव ठरवून दिला आहे. आता हरभऱ्याची आवक सुरु होऊन 15 दिवसाचा कालावधी लोटला असताना राज्यात हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. यानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 8 खरेदी केंद्र उभारले जाणार असल्याचे सांगितले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभऱ्याची काढणीची कामे उरकून थेट बाजारपेठेत विक्रीवर शेतकऱ्यांचा भर आहे. सध्या काही ठिकाणी नोंदणीला देखील सुरूवात झाली आहे.



रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केल्याने उत्पादनाच्या दृष्टीने हरभरा पिकावरच भर दिला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावरच हरभऱ्याचेच पीक आहे. शिवाय गेल्या 15 दिवसांपासून हरभरा या पिकाची आवक सुरु झाली असून खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 रुपये क्विंटलच्या आसपास हरभऱ्याला दर मिळत आहे.  केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी 5 हजार 230 हा दर ठरवून दिला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्र सुरु होणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला असून आता नोंदणी आणि 15 मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीवर असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, रब्बी हंगामात हरभरा क्षेत्रात वाढ झाली असली तरी बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट उत्पादनावर झाला आहे. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे वाढलेला घाटी अळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटलेले आहे. शिवाय सध्या हमीभावापेक्षा खुल्या बाजारपेठेत कमी दर असल्याने हमीभाव केंद्र सुरु होणे ही काळाची गरज होती. 


खरेदी केंद्र
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आपल्या हरभरा पिकाची खरेदी केंद्रवर जाऊन करु शकतात. दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघ, अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तसेच पथ्रोट व नेरपिंगळाई येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था, नेरपिंगळाई मार्फत नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्ण महिनाभर नोंदणी सुरू राहतील व 15 मार्च पासून हरभरा विक्री करू शकणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: