Rakesh Tikait : सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत. सरकार शेतकऱ्यांशी चर्चा टाळत असून, येणाऱ्या काळात मोठं शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी दिला आहे. सरकारला एकतर्फी लाठीच्या बळावर सरकार चालवायचे असल्याचेही ते म्हणाले. बागपतमधील चौगामा भागातील गंगनौली गावात शेतकऱ्यांची पंचायत झाली. या पंचायतीमध्ये बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार जोरदार निशाणा साधला. 


शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत


बागपत येथील पंचायतीमध्ये मोठ्या संखेनं शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.  यामध्ये ऊसाचे पेमेंट, भटकी जनावरे आणि कूपनलिकांवर मीटर बसवण्यासाठी आंदोलन करण्याबाबत चर्चा झाली. सरकारकडून शेतकऱ्यांवर पूर्ण अत्याचार होत आहेत, सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे टाळत असून, येणाऱ्या काळात आंदोलन करणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. मात्र, असे चालणार नसल्याचे ते म्हणाले. काही समस्या असल्यास सरकारने त्यावर चर्चा करावी. शेतकऱ्यांना मोफत वीज देणार असल्याचे तुम्ही जाहीरनाम्यात म्हटले आहे. मग याचे प्रमाण काय असेल,हे सांगितलेले नाही. तुम्ही हरियाणाचे धोरण देणार, पंजाबचे धोरण देणार की उत्तराखंडचे असेही राकेश टिकैत म्हणाले.


सरकारनं शेतकऱ्यांशी चर्चा करावी


तुम्हाला न बोलता तुम्हाला वातावरण बिघडवायचे आहे का? असा सवाल देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केला. सरकारनं शेतकऱ्यांशी बसून चर्चा करावी. तसे न करणे हा संपूर्ण निषेधार्ह आहे. धोरणाशिवाय कूपनलिकांवर मीटर बसविल्यास आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. तुम्ही लखनौला जाल तेव्हा ट्रॅक्टरने जाल. सरकारला हवे असेल तर आम्हाला गोळ्या घाला. आंदोलनाशिवाय सरकारे चालत नाहीत. त्याचबरोबर 29 मे रोजी हरिद्वार याठिकाणी होणाऱ्या महापंचायतीत शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी राकेश टिकैत यांनी केले. बागपत-हरियाणा सीमेवर पोलीस वसुली करण्याचा प्रयत्न करत आहेत. यानंतरही सरकारने शेतकऱ्यांचे म्हणणे न ऐकल्यास शेतकरी एकत्र येऊन ट्रॅक्टरने लखनौला रवाना होतील आणि आंदोलन करतील. इतर राज्यातही शेतकऱ्यांची आंदोलने होतात, असे त्यांनी मंचाला सांगितले. 


महत्वाच्या बातम्या: