बुलढाणा : निवडून आलेल्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडले पाहिजे. मागील वर्षी आंदोलनामुळे कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळाला. सरकार शेतकऱ्याला लाचार बनवत आहे. गुलामीच्या दिशेनं शेतकऱ्यांना नेलं जातंय. येत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय. 


अतिवृष्टीनं झालेल्या शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळावा यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana ) वतीनं बुलढाण्यात (Buldhana) 'एल्गार मोर्चा' काढण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उभी पिकं वाया गेली होती. शेतकऱ्यांची हाती येणारी पिकं वाया गेल्यानं राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची पिकं या पावसाच्या फटक्यातून वाचली आहेत, त्या पिकांना योग्य दर मिळावा, यासाठी आजचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून शेतकरी या आंदोलनासाठी बुलढाण्यात दाखल झाले होते.  


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी राज्य सरकरवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारकडून शेतकऱ्याला लाचार बनवले जात आहे. एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. याबरोबरच ही लढाई आता सुरू झाली असून कापूस सोयाबीन सध्या विक्रिला काढू नका असे आवाहन देखील यावेळी तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले. 


"स्टॉक लिमिट उठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र या बातम्या आताच का येत आहेत? असा प्रश्न रविकांत तुकपर यांनी यावेळी उपस्थित केला. "मोर्चा पाहून नेत्यांची प्रेस नोट काढायची स्पर्धा वाढली आहे. ज्यांनी ज्यांनी सोयाबीनचे भाव पाडले आता त्यांचे भाव पाडण्याची वेळ आली आहे, असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला आहे.  


 शेतकऱ्यांना दिली शपथ 
दरम्यान, यावेळी रविकांत तुपकर यांनी मोर्चासाठी उपस्थित राहिलेल्या  शेतकऱ्यांना शपथ देण्यात दिली.  


महत्वाच्या बातम्या


Aurangabad: औरंगाबादेत बैलगाडा शर्यतीवरून राडा; बघण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज