Agriculture News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (onion) अडचणीत आहेत. अशातच आता वांग्याचे (Brinjal) उत्पादन करणारे शेतकरीही संकटात सापडले आहेत. कारण सध्या वांग्याच्या दरातही घसरण झाली आहे. पुण्यातील पुरंदर (Purandar) तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्याला 95 किलो वांग्याचे केवळ 66 रुपये मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाना तिवटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये (Gultekdi Market Pune) या वांग्याची विक्री करण्यात आली होती. यानंतर उद्विग्न झालेल्या या शेतकऱ्याने आपल्या 11 गुंठे शेतातील वांग्याचं पीकच उपटून टाकलं आहे.
MSP : पिकाला हवीभाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी
सध्या वांग्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वांग्याला दर नसल्यामुळे पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतातील कांद्याचं पीक उपटून टाकलं आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तीन महिने कष्ट करुन पिकविलेल्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पिकाच्या काढणीचा खर्च देखील मिळालेल्या दरातून निघत नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल? याकडे लक्ष द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
10 पोते कांदा विकल्यावर सोलापुरातील शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये
सोलापूर बाजार समितीमध्ये (Solapur Market Committee) 10 पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारीला जवळपास पाचशे किलो कांदा विकला होता. मार्केट यार्डातील सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक शेतकऱ्याला दिला. मोटारभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करुन शेतकऱ्याला फक्त दोन रुपये शिल्लक राहिले होते. सुर्या ट्रेडर्स या व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक देत शेतकऱ्याची थट्टा केली आहे. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा, शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे आता तुम्हीच सांगा? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या: