Palghar Rain : राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. सध्या राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं भात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळं संकटात सापडली आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसामुळं शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात 75 हजार हेक्टर पेक्षाही जास्त क्षेत्रावर असलेली भातशेती या परतीच्या पावसामुळं संकटात सापडली आहे. तयार झालेल्या भात पिकाला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळं येथील शेतकरी पुन्हा एकदा अस्मानी संकटात सापडलाय. तयार झालेली भात पिकं शेतातच असून ऐन भात पिकं काढण्याच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून घेतो की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहेत.
सोयाबीन, कापूस पिकांनांही फटका
राज्याच्या विविध भागात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. याचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. त्याचबरोबर द्राक्ष बागांना देखील या परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरु केली आहे. अशातच आता पाऊस पडत असल्यानं पिकाचं नुकसान होत आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची सोयाबीनची काढणी झाली आहे. त्या शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेलं
सोयाबीन या पावसात भिजलं आहे. तसेच कापूस पिकाचंही मोठं नुकसान झालं आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात या पावसाचा मोठा फटका बसला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष बागा, ऊस, टोमॅटो या पिकांना देखील फटका बसला आहे.
आजही राज्यात पावसाचा अंदाज
आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आधीच पावसानं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: