Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर सुनावणी
दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंनी पालिके विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल आज उमेदवारी अर्ज भरणार.
छगन भुजबळ यांचा आज 75 वा वाढदिवस
ज्येष्ठ राजकीय नेते छगन भुजबळ यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळांचा अमृत महोत्सव सोहळा पार पडणार आहे.
प्रबोधन यात्रेचा दुसरा मेळावा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रबोधन यात्रा आज नवी मुंबईत असणार आहे. या यात्रेत सुषमा अंधारे, अरविंद सावंत, राजन विचारे, भास्कर जाधव यांच्यासारखे नेते संबोधित करणार आहेत, दुपारी 4 वाजता, विष्णुदास नाट्यगृह, वाशी येथे ही यात्रा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उना आणि चंबा दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उना आणि चंबा दौऱ्यावर आहेत. मोदी साधारण अडीच तास ते उनामध्ये असणार आहेत. यावेळी ते जाहीर सभा घेणार आहेत.
कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुप्रिम कोर्टाचा निकाल
कर्नाटक हिजाब प्रकरणी आज सुप्रिम कोर्टात निकाल येणार आहे. या याचिकेत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यात आले होते. ज्यात शाळा आणि महाविद्यालयामध्ये गणवेशाच्या नियमांचे पालन योग्य ठरवले होते.
खासदार विनायक राऊत आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील यांची टू व्हीलर रॅली
खासदार विनायक राऊत आणि काँगेसचे आमदार सतेज पाटील कुडाळ विश्रामगृह येथून टू व्हीलर रॅलीने कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडे नवीन अग्निशामक वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पोहचणार आहेत.
अमित ठाकरे आज जिल्हा जालना दौऱ्यावर
मनसे नेते अमित ठाकरे आज जिल्हा जालना दौऱ्यावर आहेत. यावेळी सकाळी 11 वाजता मनसे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी 3 वाजता सिडस कंपनी महिको कार्यालयाला भेट देणार आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या जिल्हा अकोला दौऱ्याचा दुसरा
वंचित बहुजन आगाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला जिल्हा दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील.