Cotton Price News : सध्या बाजारपेठेत कापसाला चांगलीच झळाली आल्याचे दिसत आहे. कापासाला चांगला बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू उपबाजारपेठेत कापसाच्या भावात प्रचंड तेजी आली आहे. शुक्रवारी कापसाला तब्बल 14 हजार 470 रुपयांचा दर मिळाला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी दर आहे.
400 क्विंटल कापसाची आवक
सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू येथील उपबाजारपेठेत शुक्रवारी पांढऱ्या सोन्याच्या भावाने विक्रमी उसळी घेतली आहे. कापसाने 14 हजारांचा टप्पा पार केला आहे. पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस 14 हजार 470 दराने खरेदी करण्यात आला. सेलूत शुक्रवारी तब्बल 400 क्विंटल कापसाची आवक झाली होती. त्या कापसाला तब्बल 9 हजार 700 ते 14 हजार 470 इतका भाव मिळाला आहे. यावर्षीच्या कापसाला प्रति क्विंटलसाठी मिळालेला हा दर सर्वाधिक आणि विक्रमी दर ठरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. कापसाला दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, यंदाचा कापसाचा हंगाम संपत आला तरी, सेलू मार्केट यार्डमध्ये कापसाची आवक सुरुच आहे. बाजारपेठेत कापसाला भावही भरपूर मिळत आहे. गुरुवारी (13 मे) कापसाला 13 हजार 845 इतका दर मिळाला होता. येथील बाजारपेठेत लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी होत असल्याने कापसाला चांगला दर मिळत आहे. सेलू शहरातील कापूस बाजारपेठेत सर्वात जास्त भाव मिळत असल्याने बाजूच्या जिल्ह्यातील व बाहेरील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी याठिकाणी येत आहे. सेलू उपबाजारपेठेत 100 ते 125 कापूस गाड्यांनी कापूस विक्रीकरिता आला होता. कापसाच्या भावात काही दिवस अशीच तेजी राहणार असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. येथील बाजारपेठेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे.
कापूस विक्रीच्या लिलावात चढ्या भावानं लावली जाणारी बोली हे येथे अलीकडच्या दशकभरात कापसासंदर्भात आश्वासक चित्र पाहायला मिळतं आहे. बोंडअळी, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे गेल्या अनेक वर्षांत कापूस हंगाम संकटात होता. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी कायम सैरभैर अवस्थेतच असायचा. मात्र, यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच आनंद फुलला आहे. कापसाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे चित्र दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: