Chandrapur Rain : सध्या राज्याच्या काही भागात पावसानं (rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. चंद्रपूर (Chandrapur ) जिल्ह्यातील मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती मतदारसंघांमध्ये (Bhadravati-Varora constituency) मागील वीस दिवसांपासून अतिृष्टीनं थैमान घातल्यानं हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं संपूर्ण खरिपाची पीक नष्ट झाली आहेत. त्यामुळं  शासनाने या मतदारसंघांमध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करुन, सरसकट आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन केली आहे. 


सध्या मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. त्यामुळं शासनानं या मतदारसंघांमध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. वरोरा, भद्रावती तालुक्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मशागत करुन पेरणी केली होती. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त पाऊस आल्यानं संपूर्ण पीक नष्ट झालेले आहेत. या पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली आहेत. 


दुबार पेरणीचं संकट 


अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतीच्या नुकसानीसोबतच हजारो घरांची पडझड देखील झाली आहे. तसेच मनुष्यहानी व पशुधन हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रभावित क्षेत्रांमध्ये अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे. या सर्वाची दखल घेऊन शासनानं तातडीनं मदत करण्याची मागणी नुकसानग्रस्त नागरिक करत आहेत. तसेच सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


कृत्रीम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती द्या


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य हे जगात वन्य जिवांच्या नैसर्गिक अधिवासासाठी प्रसिध्द आहे. असे असताना देखील लोहारा येथे कृत्रीम अभयारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळं कोआर झोन मधील पर्यटक संख्या घटून पर्यटन महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृत्रीम अभयारण्याच्या प्रस्तावास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन हा विषय मांडला. 


महत्त्वाच्या बातम्या: