Basmati Export: भारतातून परदेशात बासमती तांदळाची मागणी सध्या प्रचंड वाढली आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि अमेरिकेत भारताच्या तांदळाला मोठी मागणी वाढली असून एप्रिल ते जुलैमध्ये बासमतीच्या निर्यातीत 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी बासमती तांदळाची निर्यात साधारण 1.774 अब्ज एवढी होती. भारत हा जगातील बासमती तांदळाचा मोठा उत्पादक आहे. 2023-34 वर्षात भारतानं 5.83 अब्जाहून अधिक किमतीचा सुगंधी तांदूळ निर्यात केला. ज्यापैकी दोन तृतीयांशाहून अधिक तांदूळ पश्चिम आशियामध्ये निर्यात झाला.
द बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, जर आपण निर्यातीच्या प्रमाणाबाबत बोललो तर, भारताने यावर्षी एप्रिल-जुलै दरम्यान 19.17 लाख टन बासमती तांदळाची निर्यात केली आहे, तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत 16.09 लाख टन निर्यात झाली होती. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रमाणानुसार 19 टक्क्याने निर्यात वाढली आहे.
कोणत्या देशात निर्यात वाढली?
एप्रिल ते जुलैमध्ये सौदी अरेबीयाला 3,81 लाख टन बासमतीची निर्यात करण्यात आली होती. तर वर्षभरापूर्वी हा आकडा 3.03 लाख टन एवढा होता. ही निर्यात 19 टक्क्यांनी वाढली असून इराणमध्येही मागणी वाढल्यानं निर्यातीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
अमेरिकेत बासमतीची निर्यात ४२ टक्क्यांनी वाढली.
भारतातून अमेरिकेला बासमती तांदळाची निर्यात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढली आहे. यंदा भारतानं ९०,५६७ टन निर्यात केली असून मागच्या वर्षी ही निर्यात ६३७०० टन होती. अमेरिकेत सध्या सुगंधी बासमती तांदळाला मोठी मागणी असून मागील वर्षाच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी निर्यात वाढली आहे. सौदी अरेबिया, इराण, इराक आणि युनायटेड स्टेट्स सारख्या देशांच्या मागणीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जुलै कालावधीत भारताच्या बासमती तांदळाची निर्यात जवळपास 15 टक्क्यांनी वाढून $2.036 अब्ज झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बासमतीची निर्यात $1.774 अब्ज होती.
इराणमध्ये बासमतीला प्रचंड मागणी
इराणने आपल्या देशांतर्गत उत्पादकांना पाठिंबा देण्यासाठी बासमती तांदळाच्या आयातीवर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत आयात बंदी कायम राहण्याची शक्यता आहे आणि नोव्हेंबरमध्ये शिपमेंट पुन्हा सुरू होऊ शकते. त्याच वेळी, बासमती निर्यातीसाठी इराक हे तिसरे सर्वात मोठे निर्यातस्थळ म्हणून उदयास आले आहे. येथे निर्यातीचे प्रमाण 25 टक्क्यांनी वाढून 2.81 लाख टन झाले आहे. मात्र, वर्षभरापूर्वी याच काळात त्याचे प्रमाण २.२४ लाख टन होते.
हेही वाचा: