Assam Tea Garden : आसाम (Assam) सरकारने चहाच्या शेतीसंदर्भात (Tea Garden) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. चहाच्या बागेच्या एकूण जमिनीपैकी पाच टक्के जमीन इतर विविध कारणांसाठी वापरण्यास परवानगी सरकारनं दिली आहे. एका अध्यादेशात आसाम राज्य सरकारनं आसाम फिक्सेशन ऑफ सीलिंग ऑन जमीन धारण कायदा 1956 मध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये पाच टक्के जमीनवर इको-फ्रेंडली चहा पर्यटन, हरित ऊर्जा, पशुसंवर्धन याशिवाय इतर कृषी पिकांच्या लागवडीसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे.
ज्या ठिकाणी चहाच्या बागांना टिकवून ठेवण्याची परवानगी असलेल्या जमिनीत चहाचे मळे शक्य नसतील आणि पडीक आणि वापरात नसलेली जमीन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. पाच टक्के जमीन ही इको-फ्रेंडली चहा पर्यटन, नगदी पिके, बागायती पिके, फुलशेती, औषधी वनस्पती, अगर लाकूड, चंदनाचे लाकूड आणि बांबू यांचा समावेश असलेल्या कृषी पिकांची लागवड करु शकतो. तसेच पशुपालन आणि मत्स्यपालन, हरित ऊर्जा आणि अपारंपारिक ऊर्जा संसाधने, सामाजिक पायाभूत सुविधा आणि सेवा ज्यात आरोग्य केंद्रे, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, वैद्यकीय, नर्सिंग, पॅरामेडिकल संस्था, सांस्कृतिक आणि मनोरंजन प्रदर्शन केंद्रे आणि सरकारी कार्यालये यांचा समावेश आहे. तसेच अशा जमिनीमध्ये सरकारी संस्था, अन्न प्रक्रिया, मिश्रण आणि पॅकेजिंग युनिट देखील उभारले जाऊ शकते. मात्र, ही जमीन एकूण बागेच्या क्षेत्राच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त नसाव्यात असेही राज्य सरकारनं म्हटलं आहे.
भारतातील 55 टक्के चहाचे उत्पादन हे एकट्या आसाम राज्यात
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या संदर्भात मागणी करत होते. त्यावर आता सरकारनं निर्णय घेतला आहे. आम्ही राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतो. यामुळं चहाच्या बागांच्या चांगल्या आर्थिक व्यवहार्यतेस मदत होईल असे मत नॉर्थ ईस्टर्न टी असोसिएशन (NETA) चे सल्लागार विद्यानंद बरकाकोटी यांनी सांगितले. आसाममध्ये संघटित क्षेत्रात 10 लाखांहून अधिक चहा कामगार आहेत. जे सुमारे 850 मोठ्या वसाहतींमध्ये काम करतात. भारतातील 55 टक्के चहाचे उत्पादन हे एकट्या आसाम राज्यात होते.
महत्त्वाच्या बातम्या:
- West Bengal Election : चहा कामगार महिलांच्या काय आहेत समस्या? दिवसरात्र राबून हातात फक्त 200रुपये...
- Ahsan Iqbal : 'चहा कमी प्या', देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पाकिस्तानी मंत्र्यांचा सल्ला