Dhule: खरीप आणि रब्बी हंगामाच्या (Kharif and Rabi seasons) पार्श्वभूमीवर तुम्ही खतांची (Fertilizer ) खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कृषी सहसंचालकांनी तब्बल 19 कंपन्यांच्या खतांचे नमुने अप्रमाणिक आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली असून ही खते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे देखील आवाहन करण्यात आले आहे. नेमकी का आणि कशासाठी ही बंदी घालण्यात आली आहे, हे जाणून घेऊ.
खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. त्यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत (Fertilizer) विक्री करण्यावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही खते खरेदी करू नये, असे आवाहन देखील आता कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी जिंकेटेड एस एस पी, रामा फॉस्फेट उदयपूर, कृषक भारती को-ऑपरेटिव्ह चिलेटेड फेरस, सायन्स केमिकल्स नाशिक (Science Chemicals Nashik), एस एस पी के पी आर, ऍग्रो केम (Agro Chem), यासह विविध 19 खतांचे नमुने अप्रमणित आढळून आल्याने ही बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. खतांमधील इनग्रेड कमी झाल्याने ते अप्रमाणिक करण्याचे आदेश कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या रासायनिक खतांची खरेदी करू नये, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी खते बियाणे आणि कीटकनाशकांची विक्री करताना उत्पादकांचा परवाना, ओ फार्म स्टेटमेंट, प्रिन्सिपल सर्टिफिकेटची तपासणी करावी अन्यथा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा देखील इशारा कृषी सहसंचालकांच्या आदेशाने देण्यात आला आहे.
दरम्यान, या खतांवर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आता सतर्क होणे गरजेचे आहे. अप्रमणित झालेल्या खतांचा काळाबाजार रोखण्याचे देखील आव्हान आता कृषी विभागासमोर निर्माण झाले आहे. तब्बल 19 खतांच्या विक्रीवर राज्यात बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत परवडतील अशी खते (Fertilizer) बाजारात आणण्याची देखील आवश्यकता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: