Onion News : कांद्याचे विक्रमी उत्पादन अपेक्षित असताना घसरलेले कांद्याचे दर सावरण्यासाठी नाफेडमार्फत (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) कांदा खरेदी सुरु करावी अशी विनंती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी शासनाकडे केली होती. त्यानंतर कालपासून (19 एप्रील) महाराष्ट्रात नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अनिल घनवट यांनी दिली आहे. नाफेडच्या माध्यमातून चालू वर्षी अडीच लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यात होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. विक्रमी उत्पादनही अपेक्षित आहे. कांद्याचे दर कोसळणयाची शक्याता लक्षात घेऊन स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर तसेच राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. मुल्य स्थिरीकरण निधी अंतर्गत, किमान 15 रुपये प्रती किलो दराने कांदा खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने आता 2 लाख 20 हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्वी 1 लाख 70 हजार टन कांदा खरेदी करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा 50 हजार टन कांदा जास्त खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली.
सध्या प्रचलित बाजारभावाप्रमाणेच कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाफेडने घेतला आहे. कांदा खरेदीचा निर्णय झाल्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील 20 शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदी व साठवणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील कांदा खरेदीच्या वेळेस बराच आर्थिक गैरप्रकार झाला असल्याचे समोर आले आहे. या वेळेस स्वतंत्र भारत पार्टी आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. शासनाने शेतकर्यांसाठी उपलब्ध केलेल्या पैशाचा उपयोग शेतकर्यांच्या फायद्यासाठीच झाला पाहिजे हा हेतू आहेदरम्यान, तातडीने कांदा खरेदी सुरु करण्याची कार्यवाही केल्याबद्दल कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मंत्री दादाजी भुसे यांचे अनिल घनवट यांनी त्यांचे आभार मानलेत.
महत्त्वाच्या बातम्या: