Ajit Pawar On Sugar Mill Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नाशिकमध्ये साखर कारखान्यांच्या मुद्द्यावरुन सडेतोड भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी म्हटलं आहे की, आम्हा काही लोकांच्या बदनाम्या व्हायच्या त्या झाल्या. वेगवेगळ्या पद्धतीने एसीबी, सीआयडीच्या चौकशा झाल्या. सहकार खात्याच्या चौकशा रिटायर्ड न्यायाधीशांच्या माध्यमातून केल्या गेल्या. मात्र साखर कारखान्यांच्या बाबतीत कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही. काही बाबतीत अनियमितता झाली असं स्पष्टीकरण देखील अजित पवार यांनी दिलं आहे. 


अजित पवार म्हणाले की, विशेष म्हणजे आजही 12 कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे आहे. ज्याच्यात धमक असेल त्याने जावं असे आव्हानच त्यांनी दिलं.  जाणीवपूर्वक काही जण म्हणतात की ठराविक लोकांची मक्तेदारी आहे. पण कारखाने चालवणं हे काही येड्यागबाळ्याचं काम नाही असंही अजित पवार यांनी बोलून दाखवलं आहे. 


नाशिकच्या नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या अंबड शाखेचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज दुपारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.  


अजित पवार म्हणाले की, राज्यकर्ते एखादी शुगर फॅक्टरी वाचवण्यासाठी आउट ऑफ वे जाऊन काम करतात. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले की साखर कारखान्यांना हमी देण्याचं प्रकरण आमच्याकडे आणू नका, ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं. महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने काही जण चालवायला घेतात.  काही जण आरोप करतात की हेच कसे चालवतात. 12  कारखाने राज्य सहकारी बँकेला चालवायला द्यायचे ज्याच्यात धमक असेल त्याने जावं, असं ते म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की, मी राज्यात जिथे जिथे सहकार विभागाच्या एखाद्या कार्यक्रमात जातो आणि तिथे त्यांनी खूप मोठा चांदीचा वजनदार पुरस्कार दिला किंवा स्मृतिचिन्ह दिलं की समजायचं इथं काहीतरी काळबेरं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ajit Pawar : कायद्याचा बांबू प्रत्येकवेळी आडवा टाकलाच पाहिजे असे नाही, अजित पवारांचा सल्ला


जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचं काम सध्या सुरू आहे : अजित पवार 


Ajit Pawar : दंगली घडतात तेव्हा 'या' गोष्टींची जाणीव ठेवा; अजित पवारांची कळकळीची विनंती