Ajit Nawale : राज्य सरकानं दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीस स्थगिती आणि कर्ज पुनर्गठन शासनादेश जारी केला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे. ही खरीखुरी मदत नसल्याची टीका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी (Ajit Nawale) केलीय. कर्जाचे पुनर्गठन कर्जाच्या व्याजासह होणार असल्यानं  दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांचे साधे व्याज सुद्धा माफ करणार नाही, हे या शासनादेशाने स्पष्ट केल्याचे नवले म्हणाले.  आहे.


शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान कधी?


राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याच्या सलग तीन अर्थसंकल्पाच्या वेळी घोषणा केल्या आहेत. आता चौथा अर्थसंकल्प येत असतानाही अद्याप ही सुद्धा रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आलेली नसल्याचे अजित नवले म्हणाले. राज्यातील निम्म्या भूभागाला घेरणाऱ्या भीषण दुष्काळात हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज अक्षरशः मातीत गेले आहे. असे असताना कर्ज माफ करण्याऐवजी केवळ कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारी आहे. शेतकऱ्यांना यामुळं कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे अजित नवले म्हणाले.


सरकारनं नेमका काय निर्णय घेतला?


राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती दिली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पण आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात आधी झालेल्या अतिवृष्टीमुळं आणि त्यानंतर उद्भवलेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळं राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला. तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत. 


ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ तिथे सवलती


ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे, तिथे कोणत्या सवलती देण्यात येतील याविषयी देखील माहिती देण्यात आलीये. या तालुक्यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक - यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे अश्या या सवलती लागू होतील. 


महत्त्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज वसुलीसाठी दिली स्थगिती