Ahmednagar news Latest Update : राज्यात यंदा मान्सून चांगला होईल अशा अंदाज व्यक्त होत असल्याने शेतकर्‍यांची अडचण नको म्हणून अहमदनगर कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दोन दिवसात अनेक ठिकाणी पाऊस होऊन गेल्याने शेतकऱ्यांनी देखील मशागत सुरू केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात मशागतीसाठी पुरेसा पाऊस झाला असून शेतकऱ्यांपुढे यंदा रासायनिक खतांच्या वाढत्या भावाची समस्या आहे.

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यात खरिपाचे 4 लाख 47 हजार सरासरी क्षेत्र आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षी देखील 5 लाख 31 हजारांहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाच्या पिकांची पेरणी झाली होती. यंदा देखील चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त होत असल्याने कृषी विभागाने येत्या खरीपासाठी 6 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केलं आहे. जिल्हा कृषी विभागाने खरीप हंगामासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाणांची मागणी केली होती,  प्रत्यक्षात आतापर्यंत 30 हजार 432 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून ,यातील 5 हजार 214 क्विंटल बियाणांची विक्री देखील झाली आहे.

दरम्यान दरवर्षी वातावरणातील होणाऱ्या बदलानुसार पिकांच्या लागवड क्षेत्रात देखील बदल झाला असून त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यात खरिपात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरीच्या बियाणांची अधिक मागणी असते. सध्या कृषी विभागाकडे तुरीचे बियाणे-341क्विंटल, मूग- 539 क्विंटल,उडीद- 2232 क्विंटल,सोयाबीन -18965 क्विंटल, बाजरी 1631 क्विंटल उपलब्ध झाले आहे. तर शेतकऱ्यांनी बियाणे घेताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी बियाणांची पक्की पावती घ्यावी ज्यावर लॉट नंबर आहे का? तो पाहावा असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.