Agriculture News : खुल्या बाजारातील विक्री योजनेंतर्गत गहू (Wheat) आणि तांदूळ (Rice) विक्रीसाठी काढण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) महाराष्ट्र विभागांतर्गत असलेल्या 38 गोदामांमधून 38000 मेट्रिक टन गहू विक्रीसाठी काढण्यात आला आहे. तर 22 गोदामांमधून 20000 मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी काढलेला आहे. प्रत्येक बोलीदाराचे बोलीचे प्रमाण किमान 10 मेट्रिक टन असणे आवश्यक असल्याची माहिती अन्न महामंडळानं दिली आहे. प्रति बोलीदार कमाल बोलीचे प्रमाण 100 मेट्रिक टन पेक्षा जास्त नसावे असंही सांगण्यात आलं आहे.


गहू आणि तांदळाचे दर नियंत्रीत करण्यासाठी विक्री


महाराष्ट्रातील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) प्रादेशिक कार्यालयाने, पाच जुलैपर्यंत ई- लिलावाच्या माध्यमातून त्यांच्या विविध गोदामांमध्ये असलेल्या, सामान्‍य दर्जाच्या गव्हाच्या विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत. भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने मेसर्स एम-जंक्शन द्वारे बुधवारी ई-लिलाव केला जाईल, ज्यासाठी http://www.valuejunction.in/fci या संकेस्थळावर शुक्रवारी निविदा अपलोड केली जाईल. सर्व पीक वर्षासाठी आणि लागू करांसाठी निश्चित केलेली, सरासरी दर्जाच्या गव्हासाठी राखीव किंमत 2150 रुपये प्रति क्विंटल आहे. त्याचप्रमाणे, तांदळाची राखीव किंमत लागू करांसह 3100 रुपये प्रति क्विंटल आहे. गहू आणि तांदळाचे किरकोळ बाजारातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजारातील हस्तक्षेपाचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. लिलाव प्रक्रियेतील सहभागी होणाऱ्या अधिकृत विक्रेते आणि व्यापाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी एफएसएसएआय (FSSAI) परवाना अनिवार्य करण्यात आला आहे. 


उद्यापासून तांदळाचे ई लिलाव सुरु


स्थानिक खरेदीदारांसाठी ही लिलाव प्रक्रिया मर्यादित ठेवण्यात आली आहे. राज्याची जीएसटी नोंदणी तपासून आणि साठा सोडण्यापूर्वी तो तपासला गेला आहे याची खात्री केली जाणार आहे. विशिष्ट राज्यात मागणी केलेल्या साठ्याची स्थानिक पातळीवर व्यापक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे उपाय केले जातात. पहिल्या ई-लिलावात देशभरातील 457 केंद्रांमधून 4 एलएमटी गहू खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर 271 खरेदीदारांचे नवीन पॅनल तयार करण्यात आले आहे. आजपर्यंत पॅनलवर 2093 सक्रिय बोलीदार आहेत. खुली बाजार विक्री योजनेअंतर्गत अंतर्गत तांदळाचा ई-लिलाव 5 जुलै, 2023 पासून सुरू होईल. तांदळाची मूळ किंमत 3100 क्विंटल आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू आणि तांदळाचे ई-लिलाव करणार, FCI च्या अध्यक्षांची माहिती