Agriculture News : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politicis) वर्षभरात दोन राजकीय भूकंप झाले. तत्व, निष्ठा, विचारसरणी विसरुन या राजकारण्यांनी राजकारणाचा चिखल केल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. यात हा चिखल मात्र बदनाम होतोय. पण प्रत्यक्षात शेतकरी शेतातील चिखलात नेहमीच राबतो. या चिखलातून शेतकरी पीक घेतो. पण राजकारणाचा चिखल करणारे राजकारणी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळू देत नाहीत. अडचणीच्या काळात हातभार देत नाहीत. म्हणूनच एबीपी माझाने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या सद्यःस्थितीवर प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
वर्षभरापूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत गुवाहाटी गाठली होती. त्यांनतर त्यांनी भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले. त्यांनी देखील काही आमदांसह सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अजित पवार हे पुन्हा पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले तर अन्य राष्ट्रवादीच्या 8 जणांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडींवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात चाललेला चिखल सगळ्यात वाईट
सध्या राज्यात काही भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी सध्या भात लागवड करत आहेत. राज्यातील या चालू घडामोडीवर बोलताना शेतकरी म्हणाले की, आम्ही राबतो त्या चिखलापेक्षा राज्यात चाललेला चिखल सगळ्यात वाईट आहे. आम्ही राबतो तो चिखल चांगला असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. कष्टामध्ये माणूस समाधानी राहतो असे शेतकरी म्हणाले. सध्या सुरु असलेलं राजकारण पटत नाही. तरीपण जनतेला खपवून घ्यावं लागल्याचे शेतकरी म्हणाले.
सगळे पुढारी फुटीर झाले
राजरणात चांगल काही राहिलं नाही. मतदान करणचं चुकीचं असल्याचं मत एका शेतकऱ्यानं व्यक्त केलं. मतदान करायला वरचे पुढारी तसे पाहिजेत. सगळे पुढारी फुटीरवादी झाले. हा त्या पक्षात तो या पक्षात जात आहेत. राजकारण्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलंय का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलं. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे काहीच हित नाही.
शेतकऱ्याचं सरकारला काहीही दणं घेणं नाही
सोयाबीनला दर नाही. कांद्याला दर नाही. शेतकऱ्याचं सरकारला काहीही दणं घेणं नाही. आयात निर्यात धोरणाकडे सरकारचे काहीही लक्ष नसल्याचे शेतकरी म्हणाले. आमच्या मालाला बाजारभाव मिळत नाही. पुढाऱ्यांनी आमच्या हितासाठी काही केलं नसल्याचे शेतकरी म्हणाले. खुर्चीसाठी सगळी मंडळी हे राजकारण करत असल्याचे शेतकरी म्हणाले. सर्व राजकारण्यांची झोप उडाली आहे. त्यामुळं आमच्या शेतकऱ्यांचा चिखलच बरा असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं.
महत्त्वाच्या बातम्या: