Turmeric Price : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील वसमत बाजार समितीत (Vasmat Bazar Samiti) हळदीला आत्तापर्यंतचा विक्रमी दर मिळाला आहे. वसमत बाजार समितीत क्विंटलला 30 हजार रुपयांचा दर मिळाल्यानं बळीराजा समाधानी झाला आहे. देशातलाच आत्तापर्यंतचा हा सर्वोच्च विक्रमी दर मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हळदीला मिळालेल्या या विक्रमी दरामुळ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. 
 
हळदीचे हब म्हणून हिंगोली जिल्ह्याला ओळखलं जातं. हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाराही महिने हळदीची विक्री होत असते. वसमतच्या बाजार समितीत हळदीला सोन्यासारखा भाव मिळाला आहे. बाजार समितीत हळदीला तब्बल 30 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेषेराव बोंबले यांनी त्यांच्याकडील अकरा पोती हळद वसमतच्या बाजारात विक्रीसाठी आणली होती. तेव्हा या हळदीला तब्बल 30000 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला आहे. यामुळं शेतकरी मालामाल झाला आहे.


हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण


राज्यात सांगलीनंतर (Sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात होते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या (Hingoli) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. हिंगोली येथील हळदीचे मार्केट जिल्हाभरासह विदर्भात देखील प्रसिद्ध आहे. येथील मार्केटमध्ये हळदीला दर देखील चांगला मिळतो. मागील काही दिवसापासून येथील मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. येथील मार्केट यार्डात लिलाव पध्दतीने हळदीची विक्री केली जाते. त्यामुळे हळद उत्पादक येथे हळद विक्रीसाठी आणतात. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. देशात हळद काढणी झाली आहे. सध्या देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे.  इतर जिल्ह्यात सुद्धा हळदीला चांगला भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सुरुवातीला हळदीला सर्वसाधारण भाव मिळत होता. परंतू, आता मात्र चांगला भाव मिळत असल्यानं हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य


मसाला पीक म्हणून हळदीचं महत्व खूप जास्त आहे. देशात हळद उत्पादित करणारं महाराष्ट्र (Maharashtra Haldi farming) हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.  तर तेलंगाणामध्ये सर्वाधिक हळदीचं उत्पादन होतं. काही ठिकाणी हळद पिकावर करपा रोग देखील पडत असल्याचे दिसत आहे. यामुळं पिकाला मोठा फटका बसत आहे. राज्यात दरवर्षी सरासरी दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळद पीक पेरा केला जातो, मात्र काही वेळेस बदलत्या वातावरणाचा हळद पिकाला मोठा फटका बसतो.


महत्त्वाच्या बातम्या:


Turmeric : हिंगोलीच्या वसमत बाजार समितीत हळदीला विक्रमी दर, प्रतिक्विंटलला 20 हजारांचा दर मिळाल्यानं बळीराजा आनंदी