Agriculture News : इफकोच्या पहिल्या नॅनो डीएपी (DAP) खताचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी केलं. हे खत म्हणजे नायट्रोजन आणि फास्फरचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे जगातील पहिले नॅने डीएपी खत असल्याचे वक्तव्य अमित शाह यांनी केलं. समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचे शाह म्हणाले. यावेळी इफको कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 मे रोजी गुजरात दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते या नॅनो युरिया प्लॅन्टचे उद्घाटन झाले होते. त्याशिवाय गुजरातमधील सहकार क्षेत्रातील संस्थांतर्फे आयोजित परिसंवादात देखील मोदी सहभागी झाले होते. गांधीनगरमधील कलोल येथे इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडतर्फे (IFFCO) एक नॅनो फर्टिलायझर निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.
गुजरातमधील कलोल येथून नॅनो डीएपीच्या खताचे उत्पादन सुरु
नॅनो डीएपीच्या उत्पादनासाठी गुजरातमधील कलोल, ओडिशामधील कांडला आणि पारादीप या ठिकाणी युनिट उभारण्यात आली आहेत. त्यातील गुजरातमधील कलोल येथून उत्पादन सुरु झालं आहे. यावर्षी नॅनोच्या डीएपीच्या 50 दशलक्ष बाटल्याचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. हे तिन्ही प्लॅंट 2025-26 पर्यंत सुरु होणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीनं देण्यात आली आहे.
नॅनो डीएपीचा फायदा काय ?
इतर पारंपारिक डीएपीफेक्षा नॅनो डीएपी स्वस्त आहेत. नॅनो डीएपीची 50 किलोची बॅग 1350 रुपयांना आहे. तर डीएपी लिक्विडची एक बॉटल 600 रुपयांना मिळणार आहे. झाडांची उत्पादकता वाढवण्यासाठी या डीएपी खताची मदत होणार आहे. माती, पाणी आणि वायू प्रदुषण कमी होण्यास मदत होणार. कमी प्रमाणात वापर असल्यामुळं वाहतूक आणि साठवणूक खर्चात बचत होईल. पिकांमधील पोषक घटकांच्या वाढीसाठी नॅनो युरिया लिक्विड वापर केला जातो. नॅनो युरिया हे एक सुरक्षित व शाश्वत खत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: