Agriculture News : अलीकडच्या काळात शेतीत सातत्यानं नवनवीन प्रयोग होतायेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी भरघोस उत्पन्न घेत आहेत. तसेच पिकांच्या नवनवीन वाणांचा शोध लागल्यानं कमी वेळात अधिक उत्पन्न मिळत आहे. अशीच एक आंब्याची अनोखी जात आहे. ज्या आंब्याला बाराही महिने फळ येते. वर्षातून तीन वेळा आंब्याचं उत्पादन घेता येतं. जाणून घेऊयात आंब्याच्या या सदाबहार जातीबद्दल सविस्तर माहिती.


'थाई 12 मासी' असं या आंब्याच्या जातीचं नाव 


उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथील आंबा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. देशातील सर्वात मोठा शेतकरी मेळावा येथे आयोजित केला जातो. या जत्रेत विविध प्रकारच्या पिकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यावेळी जत्रेत बारमाही आंब्याच्या विविध जातींचे प्रदर्शन करण्यात आले. या आंब्याच्या झाडापासून तुम्ही वर्षातून तीन वेळा उत्पादन घेऊ शकता. आंबाप्रेमींना वर्षभर या फळाचा आस्वाद घेता येणार आहे. 'थाई 12 मासी' असं या आंब्याच्या जातीचं नाव आहे. 


पश्चिम बंगालच्या स्टॉलवर प्रदर्शनात ठेवले होते आंब्याचे झाड


थाई बारमाही आंब्याच्या झाडाला दोन वर्षांत फळे येऊ लागतात. थाई जातीचे बारमाही गोड आंब्याचे झाड पंतनगर येथील अखिल भारतीय शेतकरी मेळाव्यात पश्चिम बंगालच्या स्टॉलवर प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. आंब्याच्या या जातीची खास गोष्ट म्हणजे याच्या झाडाला वयाच्या दोन वर्षापासून फळे येऊ लागतात. गोडपणाच्या बाबतीत ते इतर आंब्यांपेक्षा पुढे आहे. याशिवाय हे झाड विषाणूमुक्तही मानले जाते.


हा आंबा आकर्षणाचा केंद्रबिंदू 


पंतनगर येथील अखिल भारतीय शेतकरी मेळाव्यात हा आंबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. थाई प्रकारातील थाई 12 मासी आंबा लोकांच्या पसंतीस उतरला आहे. आंब्याची ही जात वर्षातून तीन वेळा फळ देईल. पाच वर्षांनंतर, आंबा रोपातून एका वर्षात 50 किलोपेक्षा जास्त आंबा पिक घेता येते.


या राज्यात केली जाते आंब्याची शेती 


देशातील अनेक राज्यात याची लागवड केली जात आहे. खासगी रोपवाटिकेचे मालक अयान मंडल यांनी सांगितले की, थायलंडची ही प्रजाती बांगलादेशने विकसित केली आहे. याला कटी मन असे म्हणतात. पश्चिम बंगाल, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, यूपी येथील शेतकरी त्याची व्यावसायिक शेती करून चांगला नफा कमावतात. शेतकर्‍यांनी लागवडीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास ते बारमाही आंब्याच्या झाडापासून येत्या काही वर्षांत चांगला नफा मिळवू शकतात.


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture news : शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग, 10 गुंठ्यात 'करटूल्याची भाजी'; अशी साधली आर्थिक उन्नती